अंकलगी | अंकलगी,सोन्याळ परिसरात कर्नाटकी बेंदूर उत्साहात |

0
7

अंकलगी, वार्ताहर: अंकलगी,सोन्याळ परिसरात कर्नाटकी बेंदूर उत्साहात संपन्न झाला.अंकलगी सह परिसर सिमावर्ती भाग असल्याने परिसरातील गावाची भाषा संस्कृती,कार्यक्रमाचे कर्नाटकाचे अनुकरण करतात.त्याच धरर्ती बेंदूर सण उत्साहत संपन्न झाला.यांच दिवशी सर्व बारा बलुतेदारांची निवड करण्यात आली.गावचे स्वामी,हिरेमठ,वालीकार यांना सालाबादप्रमाणे जबाबदारी स्विकारण्याचा आजचा दिवस असतो.संध्याकाळी मानाचे पाटलांच्या बैलजोडीची वाद्याच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली.बेंदरांच्या पावसाने अनुमान लावून पुढील पिकांचे नियोजन करण्यात आले.

अंकलगी, सोन्याळ परिसरात बेंदूर सण उत्साहत संपन्न झाला.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here