प्रांताधिकारी तुषार ठोंबरे यांची चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक
जत,प्रतिनिधी: जत नगरपालिकेच्या अनेक योजनातील भष्ट्राचार, एकतर्पी व वादग्रस्त कारभारांची चौकशी करण्यासाठी चौकशी अधिकारी म्हणून जतचे प्रांताधिकारी तुषार ठोंबरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.तसेच मुख्याधिकारी हेंमत निकम यांच्या कडील अतिरिक्त कार्यभार काढून घेण्यात आला आहे. जत नगरपालिकेचा मुख्याधिकारी पदाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे.आमदार विलासराव जगताप यांच्या तक्रारीवर जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील यांनी हे आदेश काढले आहेत.
जत नगरपालिकेचा गेल्या सहा वर्षात सत्ताधाऱ्यांनी शौचालय दाखवून निधी हडप केला, स्वच्छता टेंडर मध्ये मोठा भष्ट्राचार झाला आहे. त्याशिवाय लाईट साहित्य, झेराक्स मशिन,कॉम्प्युटर खरेदीत मोठा घोटाळा झाला आहे. त्याशिवाय चुकीचे प्रोसिडींग लिहणे,माहिती अधिकार अर्जाची माहिती न देणे,कंत्राटी टेंडरमध्ये घोळ,नगरसेवकाविरूध कर्मचारी वेगळी वागणे,नगरसेवकच्या विरोधात अंदोलने करणे, मासिक बैठकीत विरोधी नगरसेवकांच्या कोणतीही म्हणणे ऐकूण न घेता एकतर्पी ठराव मंजूर करणे आदी मुद्यावर आमदार विलासराव जगताप व नगरपालिकेचे गटनेत विजय ताड व भाजपच्या नगरसेवकांनी जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील यांच्याकडे व नगरविकास राज्यमंत्री डॉ.रणजिंत पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रार केली होती.त्या तक्रारीची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील यांनी अतिरिक्त कार्यभार असलेले मुख्याधिकारी हेंमत निकम यांचा चार्ज काढून घेतला आहे.तेथे तहसिलदार अभिजित पाटील यांच्याकडे जत नगरपालिकेच्या मुख्याधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. तर प्रांताधिकारी तुषार ठोंबरे यांना नगरपालिकेच्या कामकाजाची चौकशी करण्यासाठी चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे. जिल्हाधिकारी यांचे तसे लेखी आदेश जारी केले अाहेत.
सत्ताधारी गटाच्या मनमानी कारभाराचा यामुळे भांडाफोड होणार का? असा सवाल उपस्थित होत आहे. नव्याने आलेल्या पदाधिकाऱ्यांकडूनही एकतर्पी कारभार सुरू असल्याच्या तक्रारी आहेत.





