जत,प्रतिनिधी: जत-ठाणे-दादर शिवशाही बसचे पुजन करून आमदार विलासराव जगताप यांच्या हस्ते शुभांरभ करण्यात आली.यावेळी भाजप नेते अॅड.प्रभाकर जाधव,परिवहन अधिकारी सौ.ताम्हणकर,जिल्हा परिवहन नियंत्रक श्री. कदम,आगार व्यवस्थापक श्री.व्होनराव,वाहतूक नियंत्रक महेश जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. जत आगाराला आलेल्या दोन शिवशाही बसेस या मार्गावरून चालणार आहेत.महामंडळाच्या बहुचर्चित दोन शिवशाही बस जत आगाराला मिळाल्या आहेत. त्या जत-मुंबई मार्गावर चालविण्यात येणार आहे. जत-ठाणे-दादर अशी ही बस सुरू करण्यात आली आहे.ती जतहून सायकांळी 6 सुटणार आहे तर दादरला दुसऱ्या दिवशी पहाटे साडेपाचला पोहचेल.परत तशाच पध्दतीने जत येणार आहे.जत,शेगाव,सांगोला, बारामती, पुणे,ठाणे दादर असा या शिवशाही बसचा मार्ग आहे.सोमवारी आमदार विलासराव जगताप यांच्या उपस्थितीत शिवशाही बस दादरकडे रवाना करण्यात आली.याशिवाय अनखिन दोन शिवशाही बस जत आगाराला लवकर मिळणार आहेत.त्या जत-विटा-सातारा एक्सप्रस वे मार्गे,मुंबई क्रोफोर्ट मार्केट अशी सोडण्यात येणार आहे. या बस सुरू कराव्यात म्हणून आमदार विलासराव जगताप यांनी पाठपुरावा केला होता.
जत-दादर शिवशाही बसचा शुभांरभ आमदार विलासराव जगताप यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी अॅड. प्रभाकर जाधव एसटीचे अधिकारी उपस्थित होते.





