दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी कपूर हिचा पहिला बॉलिवूड सिनेमा ‘धडक’चे पहिले गाणे ‘धडक है ना…’ रिलीज झालेय. जान्हवी कपूर आणि ईशान खट्टरने आपल्या चाहत्यांसोबत जयपूरमध्ये हे गाणे रिलीज केले. जान्हवी आणि ईशान या दोघांवर चित्रीत हे गाणे श्रेया घोषाल आणि अजय गोगवले यांनी गायले आहे. अमिताभ भट्टाचार्य यांनी या गीताचे बोल लिहिले आहेत. गाण्यात ईशान व जान्हवी दोघांचाही रोमान्स वेड लावणारा आहे, तितकेच गाणेही मनात रूंजी घालणारे आहे. श्रेया आणि अजय गोगवले यांच्या आवाजाने गाण्याला सुंदर साज चढवला आहे.