नवी दिल्ली | भारताचे ट्रम्प यांना चोख प्रत्युत्तर,अमेरिकेच्या वस्तूंवरील आयात शुल्क वाढवले |

0
4

नवी दिल्ली ; भारतातून येणा-या स्टील आणि अ‍ॅल्युमिनिअमच्या वस्तूंवर आयात शुक्ल वाढवण्याच्या अमेरिकेच्या निर्णयाला भारतानेही चोख प्रत्युत्तर दिले आहे. भारताने अमेरिकेतून येणा-या विविध वस्तुंवरील सीमा शुल्क वाढवले आहे. या उत्पादनमांमध्ये बंगाली चणा, मसूर डाळ आणि आर्टेमिया यांचा समावेश आहे. नवीन शुल्क 4ऑगस्टपासून लागू होईल, असे वित्त मंत्रालयाने आपल्या अधिसूचनेत म्हटले आहे.

वित्तमंत्रालयाने अमेरिकेतून येणा-या मटार आणि बंगाली चण्यावरील शुल्क वाढवून 60 टक्के केले आहे. तसेच मसूर डाळीवरील शुल्क वाढवून 30 टक्के करण्यात आले आहे. याशिवाय बोरिक अ‍ॅसिडवर 7.5 टक्के आणि घरगुती रिजेंटवर 10 टक्के शुल्क लावण्यात आले आहे. आर्टेमियावरील आयात शुल्कही 15 टक्के करण्यात आले आहे.

याशिवाय ठराविक प्रकारचे नट, लोह आणि स्टीलची उत्पादने, सफरचंद, नाशपाती, स्टेनलेस स्टीलची उत्पादने, टय़ूब-पाइप फिटिंग, स्क्रू, बोल्ट आणि रिवेटवरील शुल्क वाढवण्यात आले आहे. मात्र अमेरिकेतून आयात होणा-या दुचाकींवरील शुल्क वाढवण्यात आलेले नाही. अमेरिकेने ठराविक स्टील आणि अ‍ॅल्युमिनीअमच्या उत्पादनांवरील आयात शुल्क वाढवले होते. त्यामुळे भारतावर 24.1कोटी डॉलर (सुमारे 1650 कोटी) एवढा बोजा पडणार आहे. त्यामुळे अमेरिकेच्या धोरणांना प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने हे पाऊल उचलले आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here