अजातशत्रू : माजी आमदार उमाजीराव सनमडीकर |

0
20

तालुक्यातील विकासाची सुरूवात करणारे म्हैशाळ सिंचन योजनेच्या पाचव़्या ब टप्याचे शिल्पकार माजी आमदार उमाजीराव सनमडीकर यांचा आज वाढदिवस त्यानिमित्त त्यांच्या व्यक्तिमहत्वाचा थोडक्यात परिचर..
जत तालुका ज्यावेळी ऊसतोड मजूरांचा तालुका म्हणून हिणवले जात होते.त्यावेळी ऊसतोड मजूरांची मुले शिकली पाहिजेत. आपल्या तालुक्याचा इतिहास बदलण्याचा विडा उचलेले तत्कालीन आमदार आमदार उमाजीराव सनमडीकर यांनी जत तालुक्यात ऊसतोड मजूरासाठी चार आश्रम शाळा,वसतिगृह,प्राथमिक, माध्यमिक,इंग्लिश मेडियम स्कूल, टेक्निकल कॉलेज,नर्सिंग कॉलेज सुरू करून जतच्या शैक्षणिक क्षेत्रात आमदार सनमडीकर यांनी मोठे योगदान दिले आहे. आपली मुले शिकली पाहिजेत, त्यासाठी सामान्य शेतमजूर,ऊसतोड मजूरांच्या मुलांना मोफत शिकता यावे अशा शिक्षण संस्था सनमडीकर काकांनी उभ्या केल्या आहेत. त्याचबरोबर शेतीच्या पाण्याचा महत्वाचा प्रश्न सोडविण्यासाठी म्हैशाळ सिंचन योजनेसाठी तत्कालीन सरकारकडे पाठपुराव्यामुळे कवटेमंहकाळ तालुक्यापर्यत असणारी योजना जत तालुक्यात आणण्यात आमदार उमाजीराव सनमडीकर काका यांचा सिहांचा वाटा आहे,खऱ्या अर्थाने तेच योजनेचे शिल्पकार आहेत.त्यामुळे तालुक्यातील कँनॉलद्वारे पाणी पोहचलेल्या भागातील शेतकरी आज समाधानी दिसतात.काका आमदार असताना जत तालुक्यातील मोठ्या प्रमाणात कामे करण्यात आली आहेत. ग्रामीण रुग्णालय,सारखी महत्वाचा दवाखाना आमदार उमाजीराव सनमडीकर यांनी जतेत आणला.त्याशिवाय जत तालुक्यातील विविध भागातील शिक्षण संस्थेत सुमारे 3 हाजार विद्यार्थी शिकत आहेत. त्यातिल एक हाजार मुले निवाशी आहेत.त्या संस्थात 250 शिक्षक,शिक्षकत्तेर कर्मचारी काम करतात त्यांच्या हाताला काम काकामुळे मिळाले आहे. जत शहरातील तालुक्यातील नागरिकांच्यासाठी सिटीस्कॅन सेंटर उभारण्यात आले आहे.समाजहितासाठी आजही माजी आमदार उमाजीराव सनमडीकर काम करताना दिसतात.

माजी सैनिकासाठी सीडीएस कॅटिंगची उभारणी
माजी आमदार उमाजीराव सनमडीकर माजी सैनिक आहेत.त्यामुळे माजी सैनिकांच्या साठी सतत काहीतरी करत असतात.यावेळी तालुक्यातील 1500 माजी सैनिकासाठी जत शहरातील मार्केट यार्ड येथे भव्य सीडीएस कॅटिंग लवकरचं सुरू होत आहे. तेथे माजी सैनिकांसाठी सर्व वस्तू उपलब्धं होणार आहेत.शिवाय हे कॅटिंग पुर्ण सातही दिवस सुरू राहणार आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here