तालुक्यातील कॉग्रेस पक्षाचे प्रमुख नेते असलेले माजी आमदार उमाजीराव सनमडीकरांची आजही तालुक्यातील राजकरणात मजबूत पकड आहे.गेली तीन तप सक्रीय राजकारणात असलेल्या सनमडीकरांची मुरब्बी राजकारणी,दुष्काळी तालुक्यासाठी संघर्ष करणारा नेता आणि जनतेशी नाळ जुळलेला कार्यकर्ता अशी प्रतिमा आहे.सनमडीकर काका यांचा जन्म 22 जुन ला सनमडी (ता.जत)सारख्या छोट्या गावात झाला.त्याचे प्राथमिक शिक्षण सनमडीत तर माध्यमिक माडग्याळ येथे झाले.गरिब दलित कुंटुबात जन्मलेल्या उमाजीराव काकांना परिस्थितीमुळे शिक्षण अर्धवट सोडावे लागले, तारण्यात ते भारतीय लष्करात भरती झाले.20 वर्षे देशाची सेवा गेल्यानंतर सेवानिवृत्ती पत्करून ते गावी शेती व इतर व्यवसाय करू लागले.कै.भिमू कोरे(पैलवान)यांच्या मार्गदर्शनाखाली 1980 मध्ये त्यांनी सक्रीय राजकारणात प्रवेश केला.प्रथम ते पंचायत समिती वरून निवडून आले.1985 मध्ये त्यांना जत राखीव विधानसभा मतदारसंघातून कॉग्रेस पक्षाचे तिकिट मिळाले,ते त्यावेळी पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले.1990 मध्ये कॉग्रेसची रिपब्लिकन पक्षाबरोबर युती झाल्याने जतची जागा रिपब्लिकनला गेली.सनमडीकर काका अपक्ष म्हणून उभे राहून मोठ्या मताधिक्याने विजयी झाले.1995 मध्ये त्यांची हॅट्रट्रिक चुकली,परंतू 1999 मध्ये पुन्हा जतच्या मतदारांनी त्यांना मोठ्या मताधिक्याने विधानसभेत पाठविले.कॉग्रेस पक्षाने 1990 पासून जत पंचायत समिती,जिल्हा परिषद, साखर कारखान्याची निवडणूक त्यांच्या नेतृत्वाखालील लढविली,या निवडणूकीत त्यांना चांगले यश मिळविले. कॉग्रेसचे तत्कालीन ताकतवान नेते असतानाही काकांनी नेतृत्व आपल्याकडे ठेवण्यात यश मिळविले होते.सनमडीकर काकांचे नेतृत्व बहरले होते.ते आजतागायत कायम आहे. आजही ते जत साखर कारखाना सभासदाच्या मालकीचा व्हावा यासाठी झटत आहेत.त्यांत त्यांना यश आले आहे.त्यांमुळे जत कारखांना पुन्हा सभासदाच्या मालकीचा होणार आहे. सनमडीकर काकांनी जतच्या दुष्काळी जनतेचे प्रश्न सातत्याने शासनाकडे मांडले.जत साखर कारखाना मंजूरी व उभारणीत त्यांचा मोठा वाटा होता. तालुक्यातील शेतकऱ्यांना वरदान ठरणाऱ्या म्हैशाळ सिंचन योजनेच्या सहाव्या टप्यासाठी त्यांनी शासनाकडे पाठपुरावा केला. तत्कालीन मुख्यंमञी शरद पवार यांच्याकडून त्यांनी सहाव्या टप्याला योजनेला 1993 ला मंजूरी मिळविली.तालुक्यातील संखसह अनेक लघुपांटबंधारे तलावाची कामेही त्यांनी मंजूर करून तालुक्यात मोठ्या संख्येने तलावे बांधली आहेत.तालुक्यातील गौरगरिब,मागास विद्यार्थ्यासाठी त्यांनी जत,सनमडी, माडग्याळ येथे आश्रमशाळा सुरू केल्या,कन्नड, मराठी माध्यमाचे डि.एड.कॉलेज, इंजिनीरिंग कॉलेज, नर्सिंग कॉलेज, इंग्रजी माध्यमाचे शाळा सुरू केल्या आहेत. त्यामुळे सुमारे तीन हाजार विद्यार्थ्याची सोय झाली आहे.250जणांना यामुळे रोजगार मिळाला आहे. अगदी 80 वर्षाच्या वयातही ते कार्य मग्न असतात.त्यांना दिर्घायुष्य लाभो ही प्रार्थना….
माजी आमदार उमाजीराव सनमडीकर काका आजही सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहतात.
प्राचार्य दशरथ वाघमारे सर
सिध्दार्थ पॉलिटेक्निक कॉलेज,जत





