सोन्याळ | ग्रामपंचायतीच्या “आपले सरकार” सेवा केंद्रावर आधार कार्ड सेवा सुरू करावी |

0
7

सोन्याळ,वार्ताहर: गावा गावात सुरू असलेल्या “आपले सरकार”सेवा केंद्रावर आधार कार्ड सेवा सुरू करावी अशी मागणी ग्रां.प.सदस्य विजयकुमार बगली यांनी केली आहे.
जत तालुक्यातील 111 ग्रामपंचायती पैंकी क्लस्टर सोडून सुमारे 90 ग्रामपंचायतीमध्ये सध्या आपले सरकार सेवा केंद्र सुरू आहे. मात्र या केंद्रावर आधार कार्ड सेवा सुरू नाही.त्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. शासकीय कार्यालये,बँका,शाळा कॉलेज अशा ठिकाणी आधार कार्ड सक्तीचे केले आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे आधार कार्ड नाही अशा नागरिंकाना तालुक्याच्या ठिकाणी जाऊन आधार कार्ड काढावे लागत आहे. त्यात वेळ व पैसा वाया जात आहे. सामान्य मजूरांना एक दिवसाची मजुरी बुडवून आधारकार्ड काढावे लागत आहे.त्यातच जत येथे सुरू असलेल्या आधार कार्ड सेंटरवर एका दिवसात आधार कार्ड काढायचे काम होईल यांची शाश्वती नसते.त्यामुळे दुसऱ्यांदिवशीही हेलपाटा घालावा लागतो आहे.ग्रामपंचायतीमध्ये आधारकार्ड सेंटर सुरू केल्यास नागरिकांची सोय होणार आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here