जत,प्रतिनिधी: जि.प.शाळा डफळापूर येथे सर्व प्रथम ढोल, झांजच्या गजरात शैक्षणिक जागृती वारी काढण्यात आली. तद्नंतर जिल्हा परिषद सदस्य महादेव पाटील,सरपंच, बालिका चव्हाण,ग्रा.प.सदस्य बाबासाहेब माळी, विजया माळी,शेतकरी संघटनेचे दिनकर संकपाळ, एस.एम.सी अध्यक्ष धनाजी चव्हाण व संजय सूर्यवंशी,केंद्राचे केंद्रप्रमुख शंकर बेले, पालक यांच्याहस्ते नवागतांचे पाठ्यपुस्तक व गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.यावेळी शाळेत नवीन हजर झालेले शिक्षक शंकर कुंभार व आरती कांबळे,सरपंच यांच्या हस्ते शाळेत स्वागत करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना जि.प.सदस्य यांनी शाळा निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. ह्या शाळेमध्ये शिकणे म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात शकणे,तसेच खूप खूप शिका जीवनात यशस्वी व्हा.तसेच सरपंचांनी ही शुभेच्छा दिल्या.ग्रा.प.सदस्य बाबासाहेब माळी यांनी शाळेतील सर्व बालकांना खाऊ वाटप करून शुभेच्छा दिल्या.उद्योगरत्न संकपाळ सूत्रसंचालन केले, अजेंता लोंढे,मोहनाबाई दिघे,अलका लांडे यांनी शुभेच्छा दिल्या शेवटी मुख्याध्यापक रेखा कोरे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.
डफळापूर जि.प.शाळेत नवागतांचा स्वागत व पुस्तक दिन समारंभ उत्साहात साजरा करण्यात आला.





