जत | तलावात पडून शेतमजूर महिलेचा मुत्यू |

0
5

जत, प्रतिनिधी ;पुजा सुनिल कांबळे (वय-22,रा.उमराणी रोड) या महिलेचा शेततलावात बुडून मुत्यू झाला. ही दुर्घटना बुधवारी सायकांळी घडली. याबाबत जत पोलिसात नोंद झाली आहे.
पोलिसाकडून मिळालेली माहिती अशी, मेंढिगिरी रोडवर एका शेतात पुजा कांबळे या शेतमजूर म्हणून काम करतात. तेथे जनावरे चरवत असताना शेततलावात पाय घसरून पडल्या. त्यांना पोहता येत नसल्याने पाण्यात बुडून मुत्यू झाला.
शेजारच्या काही लोंकांनी पुजाला पाण्याबाहेर काढून जत ग्रामीण रुग्णालयांत दाखल केले. मात्र तत्पुर्वी पुजाचा मुत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.याबाबतची फिर्याद डॉ.जानकर यांनी जत पोलिसात दिली आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here