जत,प्रतिनिधी: पोलीस जनता यांच्यामध्ये माणुसकीचा सेतू बांधणारे, जत व कवठेमहांकाळ पोलीसांचे कुटुंबप्रमुख म्हणून ज्यांची ख्याती आहे.ते डिवायएसपी नागनाथ वाकुडे यांची पुणे येथे नुकतीच बदली झाली आहे.
स्वच्छ, चारिञ्यसंपन्न व जनतेच्या जवळचा पोलिस अधिकारी म्हणून वाकुडे यांची जत,कवटेमंहकाळ तालुक्याला ओंळख आहे.गेल्या तीन वर्षात डिवायएसपी वाकुडे यांनी अनेक मोठ्या घटना होताहोता आपल्या अनुभव काैशल्यावर रोखल्याने कायदासुव्यस्था आबाधित राहून तेथे आज शांतता नांदते आहे.
जत तालुका तसा दुर्लक्षीत आहे. गावांचे अंतर लांब पल्याचे सिमावर्ती भाग साधारणं येथे सहजासहजी अधिकाऱ्यांचा येण्यास नकार असतो.मात्र मुळचे पुणे शहरातील असलेले डिवायएसपी वाकुडे यांनी जतचा कार्यभार स्विकारत जी पोलिस जनतेत सुसंवाद साधत घडी बसवली आहे. ती वाखण्याजोगी आहे. मोठा अधिकारी असतानासुद्धा सामान्य नागरिकालांही वाकुडे साहेबाच्या केबिनमध्ये थेट प्रवेश मिळतो. नुसता प्रवेशच नव्हे तर कोणत्याही गाऱ्हांण्यावर मार्ग काढून त्यांची समस्या सोडविली जाते. त्यामुळे एकवेळ पोलिस स्टेशनला जाण्यासाठी नागरिंक दबकतात मात्र डिवायएसपी वाकुडे यांना थेट भेटतात. वाकुडे साहेब हे कधीही कुणाची भेट टाळत नाहीत,राजकीय नेते,अधिकारी, संघटनाचे पदाधिकारी, सामान्य नागरिकांंची दररोज त्यांच्या कार्यालयात ये-जा सुरू असते.या सुसंवादामुळे जत तालुक्यातील सर्वात लोकप्रिय पोलिस अधिकारी म्हणून ते परिचित झाले आहेत. त्यांची बदली झाल्याने त्यांना भेटण्यासाठी गेल्या चार दिवसापासून कार्यालयात मोठी गर्दी सुरू आहे. अनेक ठिकाणी सत्कार केले जात आहेत. जनतेशी नाळ जोडलेला जनतेचा अधिकारी म्हणून वाकुडे साहेब यांना जे प्रेम मिळते आहे.त्यावंर त्यांनाही केलेल्या कामाचे चिज झाल्याचे वाटते.
कायम गुन्हेगारी,अवैद्य धंदे,ग्रुप,पक्षीय वादामुळे जतला कायदासुव्यस्था अडणचणीत होती,मात्र डिवायएसपी वाकुर्डे यांनी जे गेल्या तीन वर्षात केले आहे. त्यामुळे वाद करणाऱ्यांच्या मानसिकतेत बदल पाहायला मिळतोय.एक कृत्यव्यदक्ष,सामान्य जनतेचा अधिकारी आता येत्या काही दिवसात जत सोडून जात आहे.
जतचे डिवायएसपी नागनाथ वाकुडे यांची बदली झाली. तरीही कृत्यव्यदक्षता कायम आहे.कवठेमंहाकाळ येथील कार्यक्रमा दरम्यान आपल्या ज्युनिअर अधिकाऱ्यांला सुचना देताना





