आंवढी: जतचे डिवायएसपी नागनाथ वाकुडे यांची पुणे येथे बदली झाल्याबद्दल आंवढी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. जत तालुक्यातील कायदासुव्यस्था आबाधित ठेवून जनतेशी नाळ जोडलेला जनतेचा अधिकारी म्हणून डिवायएसपी वाकुर्डे यांचा नावलौकिक होता.जत तालुक्यातील जनतेविषयी आपलेपणाची भावना व पोलिस जनता हा सुसंवाद साधत कायद्याचा आदर व धाक ठेवून त्यांनी गेली तीन वर्षे सेवा बजावली आहे. त्यांच्या बदलीने चांगल्या अधिकाऱ्यांला जत तालुका मुकला असल्याची खंत यावेळी आंवढी करांनी व्यक्त केली.
यावेळी डॉ.आण्णासाहेब कोडक,उपसंरपच प्रदिप कोडक,भगवान पवार,पडिंत सर आदी मान्यवर उपस्थित होते.
जतचे डिवायएसपी नागनाथ वाकुडे यांची बदली झाल्याबद्दल आंवढी ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.





