
भारत आणि चीन या दोन देशांमधील भक्कम आणि स्थिर संबंध जगाला स्थिरता आणि शांतीची प्रेरणा देतील असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनमधील किंगदाहो येथे व्यक्त केला.
किंगदाओ- भारत आणि चीन या दोन देशांमधील भक्कम आणि स्थिर संबंध जगाला स्थिरता आणि शांतीची प्रेरणा देतील असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनमधील किंगदाहो येथे व्यक्त केला.
चीनच्या किंगदाहो येथे पंतप्रधान मोदी यांनी शनिवारी राष्ट्राध्यक्ष शी चिनफिंग यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय सहकायार्बाबतच्या अनेक मुद्द्यांवर महत्वपूर्ण चर्चा केली.
या भेटीदरम्यान भारत आणि चीनदरम्यान सामंजस्य करारावर स्वाक्ष-याही करण्यात आल्या. त्यानंतर पंतप्रधानांनी आपले मनोगत व्यक्त केले.



