जत | नगरपालिकेच्या निष्क्रीय कारभाराच्या निर्षेधार्थ विक्रम ढोणेचे एक दिवशीय उपोषण | www.sankettimes.com

0
5

जत,प्रतिनिधी:जत नगरपरिषदेला जतला 8 जून रोजी सहा वर्षे पुर्ण झाली आहेत.या सहा वर्षाच्या नगरपरिषदेच्या निष्क्रिय कारभाराच्या निषेधार्थ नगरपरीषद प्रशासन व पदाधिकारी यांचे लक्ष वेधण्यासाठी जत नगरपरिषदेच्या कार्यालया समोर   अनोख्या अशा संविधानिक पद्धतीने नागरिकांना होणाऱ्या कचऱ्यांच्या त्रासाचे प्रतिकात्मक कचऱ्यांच्या ढिगाऱ्यावर बसून सामाजिक कार्येकर्ते विक्रम ढोणे यानी एक दिवसीय उपोषण केले.
            या उपोषणास अनेक नागरिंक व भाजपाच्या नगरसेविकांनी पाठींबा दिला. उपोषणात कुमार कोळी, राहूल शिदे,युवराज जाधव,पिंटू व्हनमाने, हणमत कांबळे  सहभागी झाले होते.दरम्यान मुख्याधिकारी याच्यांबरोबर बैठक समस्या सोडवू असे  कार्यालय प्रमुख श्री.भोसले व आंनदराव आवताडे यांनी आश्वासन दिल्यानंतर उपोषण सायंकाळी मागे घेण्यात आले.
यावेळी बोलताना विक्रम ढोणे म्हणाले की,सहा वर्षात नगरपरीषद व ग्रामपंचयातीच्या कारभारात कोणताही बदल झाला नाही. विकासाच्या,कारभाऱ्यांच्या वादात नेमका पालिकेत काय चाललयं हे समजत नाही. फक्त नागरी सुविधा करामध्ये वाढ झालेली आहे. प्रत्यक्षात सुविधांचा अभाव आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या बिरनाळ तलाव पूर्ण क्षमतेने भरलेला असूनही नियोजनाअभावी शहराला स्वच्छ व मुबलक पाणीपुरवठा सुरळीत होत नाही.स्वच्छतेसाठी महिन्याला नगरपरीषदने लाखो रुपये खर्च करूनही स्वच्छतेचा बोजवारा उडत आहे.त्यामुळे साथीचे आजार शहरात पसरत आहेत. नगरपरीषद हद्दीतील जागेची खरेदी विक्री करताना ना-हरकत प्रमाणपत्राची गरज नसताना अडवणूक होत आहे. प्रशासन व कर्मचारी यांच्यावर कोणाचेही नियंत्रण नाही.त्यांचा मनमानी कारभार चालू आहे. महिला पदाधिकारी यांच्या नातेवाईकांचा प्रशासनाच्या कारभारात हस्तक्षेप झाल्याने कर्मचाऱ्यावर मानसिक दडपण येऊन त्यांच्या कामावर विपरित परिणाम होत आहे. प्रशासन व कर्मचारी यांना विश्वासात घेऊन शहराच्या विकासासाठी नियोजन होत नाही. प्रशासनाने तयार केलेल्या अंदाजपत्रकाप्रमाणे कामे होत नाहीत.याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे.शहरात सध्या जी विकासकामे सुरू आहेत त्या कामाचा गुणवत्ता व दर्जा याकडे दुर्लक्ष होत आहे. माहिती अधिकार कायदा हा केंद्र शासनाचा कायदा असून तो कार्यालयास बंधनकारक असतानासुद्धा एकाही अर्जाचे उत्तर देण्यास नगरपरीषद प्रशासन टाळते.जत शहरात महिला व पुरुषासाठी प्रमुख ठिकाणी सार्वजनिक विधी करण्यासाठी व्यवस्था नाही.याची वारंवार मागणी करूनही दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे उपोषण करावे लागले आहेत. यापुढे आमच्या मागण्या मान्य न झाल्यास यापुढेही असेचं शांततेत अंदोलन करू असे यावेळी ढोणे यांनी सांगितले.

जत नगरपालिकेकडून नागरी सुविधाकडेच दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते विक्रम ढोणे यांनी एकदिवशीय उपोषण केले.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here