जत | एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या संपाला जत आगारात 100 टक्के पांठिबा | www.sankettimes.com

0
7

जत,प्रतिनिधी:एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी मध्यरात्रीपासून अचानक संप पुकारल्यामुळे जत बस स्थानकावर प्रवाशांचा खोळंबा झाला आहे.गुरूवारी मध्यरात्री पासून अचानक कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने प्रवाशांची ताराबंळ उडाली आहे. सकाळपासून जत आगारात प्रवाशी येत होते मात्र बसेस बंद असल्याने त्यांची मोठी अडचण होत होती. दरम्यान जत डेपोत शंभर टक्के कर्मचाऱ्यांचा संपाला पाठिंबा दर्शवला आहे.कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय संप मागे घेणार नसल्याची ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे. राज्य परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी एकतर्फी वेतन वाढ केली आहे. त्यांनी एकप्रकारे हा निर्णय आमच्यावर लादला आहे. हा निर्णय आम्हाला मान्य नाही. या संपात  कोणत्याही राजकीय नेत्याचा पाठिंबा नाही. आक्रोश व्यक्त करण्यासाठी आम्ही  स्वंयकृतीने काम बंद आंदोलनात सहभागी झालो आहोत. आतापर्यंत या आंदोलनाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि परिवहन मंत्री रावते  यांनी कोणताही संपर्क केलेला नाही, असे कर्मचाऱ्यांनी सांगितले.
एसटी बस सेवा बंद बस स्थानकामध्ये प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. चौकशीदरम्यान त्यांना दुपारपर्यंत व्यवस्था होईल, असे सांगण्यात येत होते मात्र सध्यांकाळ पर्यत बसेस सुरू नव्हत्या.त्यामुळे ताटकळत उभे रहावे लागत असल्यामुळे प्रवासी अक्षरश: वैतागले होते.

जत बसस्थानकात कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बसेस असे स्थानकांत थांबून होत्या.  
 

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here