संख | योगदिनाच्या योग-उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हा: अंमृतानंद महास्वामीजी

0
7

संख,वार्ताहर: बालगाव ता.जत येथील योग-उत्सवात निमित्त जनजागृत्ती करण्यासाठी आश्रमाचे अमृतानंद महास्वामीजी यांनी संख येथे एक दिवसीय योगाचे मार्गदर्शन केले.

यावेळी बोलताना अंमृतानंद महास्वामीजी म्हणाले,बालगाव येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त ऐतिहासिक योग-उत्सवाचे आयोजन केले आहे. यात एक लाख जणांचा सुर्यनमस्कार करून वर्ल्ड रेकार्ड करायचे आहे.त्याचबरोबर योगाचे महत्व कळावे यासाठी ग्रामीण भागात या क्रार्यक्रमाचे आयोजन केले आहे. परिसरातील शाळेतील विद्यार्थी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा.योग-उत्सवाच्या पुर्व तयारीनिमित्त संख येथील गुरूबसव विद्यामंदिर कॉलेजच्या मैदानात या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अंमृतानंद महास्वामीजीनी योगासने,सुर्यनमस्काराचे प्रात्याक्षित करून मार्गदर्शन केले.

यावेळी माजी सभापती आर.के.पाटील,किरण पाटील,विजय पाटील,संखच्या सरपंच सौ.मंगलताई रा.पाटील,उप सरपंच,ग्रा.पं.सदस्य,सोसायटी चेअरमन,सदस्य,शाळेचे सर्व शिक्षक,मुर्ग्याप्पा घाळी,गुरूबसु वाघोली,डॉ.दयानंद वाघोली,शरणाप्पा शिळीन,श्रीशैल बिरादार,ग्रामसेवक,आर.एम.कन्नुरे ,तमन्ना बांगेळी ,व तसेच जय भवानी तरूण मित्र मंडळ,ऊँ ग्रूपचे,अध्यक्ष व उपाध्यक्ष,संखचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संख येथे योग शिबारात योगाचे प्रात्याक्षिक करून दाखविताना अंमृतानंद महास्वामीजी

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here