जत,प्रतिनिधी: जत नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांवर पदाधिकाऱ्यांकडून होणाऱ्या अत्याचार,व मानसिक त्रास थांबावा या मागणीसाठी पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद अंदोलन केले.संबधितांवर तातडीने कारवाई करावी या मागणीचे निवेदन नगराध्यक्ष,मुख्याधिकाऱ्यांना दिले.निवेदनात म्हटले आहे की, पालिकेचे स्विकृत्त नगरसेवक उमेश सांवत,व विद्यमान नगरसेवक कु.जयश्री मोटे यांचे बंन्धू संतोष मोटे,प्रकाश मोटे यांनी लिपिक,पाणी पुरवठा कर्मचाऱ्यांना मी सांगितलेली कामे करत नाहीस,आवक-जावक विभागातील रजिस्टर पाहण्यास दिले नाही म्हणून तुम्हाला काम करायचे आहे का नाही?असे म्हणत उमेश सांवत यांच्याकडून शिवीगाळ व मारण्याची धमकी दिली आहे. यापुर्वीही असे प्रकार झाले आहेत.त्यामुळे कर्मचाऱ्यांना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे तातडीने संबधितावर कारवाई करावी अशी मागणी निवेदनात केली आहे.निवेदनावर विजय माळी,नितिन कांबळे,राजकुमार वाघोली,संतोष माळी,सजिवंनी धडसूळ,अस्लम करोली,सुनिता कांबळे यांच्या सह्या आहेत.
जत नगरपालिका कर्मचाऱ्यांना दमदाटी करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी पालिका कर्मचाऱ्यांनी काम बंद अंदोलन करण्यात आले.
पालिका कर्मचाऱ्यांचे कामबंद अंदोलन अखेर मागे
जत,प्रतिनिधी: जत नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद अंदोलन प्रशासनाच्या आश्वासनानंतर अखेर मागे घेण्यात आले.
जत पालिकेच्या नगरसेवकच्या नातेवाईक व काही नगरसेवकच्या दमबाजीमुळे वैतागलेल्या कर्मचाऱ्यांनी सोमवारी काम बंद अंदोलन केले होते. सर्व कर्मचारी कार्यालयाबाहेर ठिय्या मांडत संबधितांचा निषेध करत कारवाई करण्याची मागणी केली होेती.नगराध्यक्ष,व पालिकेच्या अधिकाऱ्यांनी यापुढे कर्मचाऱ्यांनी कोणत्याही नगरसेवकाचा नातेवाईक बोलणार नाही.कर्मचाऱ्यांनी सन्मानाची वागणूक दिली जाईल.त्यातूनही कोणाकडून दमबाजीचा प्रकार झाल्यास त्यांच्यावर कायदेशिर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिल्याने कर्मचाऱ्यांनी अंदोलन मागे घेत काम सुरू केले आहे.





