सांगली | अंनतपूरमध्ये जुन्या वादातून खूनी हल्ला | www.sankettimes.com

0
6

दोन भाव गंभीर: डफळापूरच्या पाटोळे कुटुंबीयाचे कृत्य : अथणी पोलिसांचा संशयितांचा दोन दिवसापासून डफळापूरात शोध

सांगली: नातेवाईकांमध्ये असलेल्या जुन्या वादातून अंनतपूर (ता.अथणी)येथे दोघा सख्या भावांवर चाकू,कुऱ्हाडीने खुनीहल्ला करण्यात आला. यामध्ये अशोक शिवाप्पा सनदी(वय-40),राजू शिवाप्पा सनदी(वय-30) हे गंभीर जखमी झाले आहेत. रविवारी सायकांळी ही घटना घडली. याप्रकरणी डफळापूर (ता.जत)येथील पाटोळे कुटुंबीयातील पाचजणाविरोधात अथणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गेली दोन दिवस अथणी पोलिस डफळापूर येथे सशयिंताच्या शोधासाठी येत आहेत. पोपट पाटोळे,पवन पाटोळे,अक्षय पाटोळे व अन्य दोन  अनओळखी अशी गुन्हा दाखल झालेल्याची नावे आहेत.डफळापूर येथील पाटोळे कुटुंबीयाचे अंनतपूर येथील सनदी कुंटुब एकमेकांचे नातेवाईक आहेत.त्यांच्यात कोंटुबिक वाद आहे.त्यातून अनेकवेळा वादाच्या घटना घडल्या होत्या.
त्यातून शनिवारी वाद झाला होता.तो मिटविण्यासाठी रविवारी सायकांळी पाटोळे बंन्धू गेलेले असताना जुना वाद उफाळून आल्याने ही मारामारीची घटना घडल्याचे घटनास्थळावरून समजते आहे.त्यात सनदी वस्तीवरील या दोन भावावर अचानक हल्ला केला.त्यात दोघावरही चाकू,कुऱ्हाडीने वर्मी वार करण्यात आले आहेत. दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडल्याने हल्लेखोर निघून गेले.जखमींना अथणी शासकीय रुग्णालयांत दाखल करण्यात आले. मात्र दोघांचीही प्रकृत्ती गंभीर बनल्याने त्यांना मिरज सिव्हिल रुग्णालयांत हलविण्यात आले आहे. घटनास्थळ पोलिसांनी पंचनामा केला आहे. पाच जणाविराधोंत अथणी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. हल्लेखोरांना पकडण्यासाठी अथणी पोलिसाचे पथक गेली दोन दिवसापासून डफळापूर परिसरात शोध घेत आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here