जत,प्रतिनिधी: शेगाव-वाळेखिंडी रस्त्यावरून दुचाकीवरून चंदनाच्या तस्करी करणारे दोघेजण जत पोलिसांच्या सापळ्यात पकडले.त्यातील एकजण पळाला तर दुचाकी,चंदनाचे ओडके,व एकजणास पोलिसांनी पकडत सुमारे 63 हाजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.पाच्छापूर काही संशियत चंदन तस्करी करत असल्याच्या खबऱ्यांच्या माहिती वरून जत पोलिसाच्या पथकाने धनाजी तातोबा पाटील याला पकडत 63 हाजार रूपयाचे चंदन जप्त केले.तर अन्य एक प्रकाश लक्ष्मण मोरे हा फरारी झाला आहे. दोघेही पाच्छापूर येथील रहिवाशी आहेत.सोमवारी सायकांळी ही कारवाई केली.
याप्रकरणी पो.कॉ. केरबा चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जत पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
वाढत्या चंदन तस्करीच्या पाश्वभूमीवर जत पोलिसांनी ही कारवाई केली. सशयिंत दोघेजण दुचाकीवरून शेगाव-वाळेखिंडी रस्त्यावरून चंदनाची वाहतूक करत असल्याचा संशय डिबीच्या पोलिस कॉन्टेबल केरबा चव्हाण,दौलू कोळी,अमोल चव्हाण यांना आल्याने त्यांनी त्यांची दुचाकी अडवत तपासणी केली असता ओल्या चंदनाचे 21 किलो वजनाचे 8 तुकडे आढळूंन आले.दुचाकीवरील एक जण पोलिसांनी पकडताच पळून गेला आहे.
त्यांची बाजारभावानुसार 63 हाजार रुपये किंमत होते.अधिक तपाल रणजिंत गुंडरे करत आहेत.





