जत का. प्रतिनिधी : जत तालुक्यातील ग्राहकांना वीजपुरवठा करणार्या कमी-अधिक दाबाच्या वीज वाहिन्या दुरुस्तीचे काम व्हावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. तालुक्यातील 112 गावांमधील वीज ग्राहकांना जत ,संख या मोठ्या उपकेंद्रासह विविध गावातील सब स्टेशनमधून ठिकाणच्या उपकेंद्रातून 11 केव्ही वाहिनीद्वारे वीजपुरवठा करण्यात येतो. तर या उपकेंद्रांना 132 केव्ही उपकेंद्रातून 33 केव्ही वाहिनीद्वारे वीजपुरवठा करण्यात येतो. कमी-अधिक दाबाच्या तिसभर वाहिन्यांचे जाळे तालुक्यात विणल्या गेले आहे. या वाहिन्या माळरान, डोंगराळ भाग, शेतीमधून जातात. उन्हाच्या तीव्रतेमुळे या वाहिनींचे काही साहित्य खराब होतात. तर काही ठिकाणी झाडे-झुडूपे वाहिनींना लागून अडथळे निर्माण होतात. पाऊस पडला की या वाहिन्या वेळोवेळी खराब होवून वीजपुरवठा खंडित होण्याच्या प्रकारात वाढ होते. पाऊस झालेला असल्याने चोहीकडे चिखल झालेला असतो, अशावेळी खराब झालेली वाहिनी दुरुस्त करण्याच्या कामात अडथळे निर्माण होतात. परिणामी ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित राहतो. त्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. बऱ्याच गावाना वीजपुरवठा करणारी वाहिन्या जात असलेल्या शेतात पाऊसाळ्यात खाबं आरण्याचे प्रकार होतात . काही मानवी वस्तीमध्ये या वाहिनीचे काही खांब आडवे झाले आहेत. ते केव्हाही जमिनीवर कोसळू शकतात.त्यामुळे विद्युत वितरण कंपनीच्या कडून सर्व तालुक्यातील विद्युत वाहिन्याची माहिती घेऊन पाऊसाळ्या आधी कामे करावीत अशी मागणी आहे.





