जत,प्रतिनिधी: तालुक्यातील डफळापूर येथे पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून फरशी व दगडाने मारहाण करून किशोर कांबळे,आनंद शेलार,तेजस वाघमारे,शुभम उबाळे,वृशाल माने सर्व. रा.डफळापूर या पाच जणांना जखमी केल्याच्या आरोपावरून आठ जणांच्या विरोधात आज जत पोलिसात किशोर कांबळे यानी फिर्याद दाखल केली आहे. ही घटना बुधवार दिनांक 30 मे रोजी रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान डफळापूर गावात घडली आहे. याप्रकरणी अद्याप कोणासही अटक करण्यात आली नाही.
याबाबत अधिक माहिती अशी की,वरील पाचजण गावातील मुख्य चौकात बोलत थांबले असताना तानाजी चव्हाण,धनाजी चव्हाण,साहेबराव चव्हाण,संजय पाटील,मुन्ना चव्हाण,पापा चव्हाण , संदीप चव्हाण, सागर चव्हाण सर्व रा.डफळापूर हे आठजण तेथे आले व येथे बोलत का थांबला आहे असे म्हणून मारहाण केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित गुंडरे करत आहेत.





