जत,प्रतिनिधी:जत तालुक्याचे भाजपचे नेते,कृषी उत्पन्न बाजार समिती सांगलीचे माजी सभापती प्रकाश जमदाडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला.त्यांना अनेक राजकीय,सामाजिक शैक्षणिक,वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींनी शुभेच्छा दिल्या.वाढदिवसानिमित्त बनाळीत गुरुवार पासून अंडर आर्म क्रिकेट स्पर्धा सुरु आहेत.वाढदिनी वृक्षाचे रोपटे,महापुरूषाचे चरित्राचे पुस्तक देऊन भेट देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.
वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन
वाढदिवसाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.या रक्तदान शिबिराचे उद्घाटन आमदार विलासराव जगताप यांनी केले.ते यावेळी म्हणाले कि,वाढदिवसा निमित्त रक्तदान शिबिर ,क्रिकेट स्पर्धा आयोजित करणे हा चांगला उपक्रम आहे.रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे.तर क्रिकेट स्पर्धातून खेळाडूंना वाव मिळतो. या रक्तदान शिबिरात 76 रक्तदात्यानी रक्तदान केले.
वाढदिवसाच्या शुभेच्छा दूरध्वनीद्वारे खासदार संजयकाका पाटील,माजी आमदार दिनकर तात्या पाटील,सदाशिव पाटील ,इस्लामपुरचे माजी उपनगराध्यक्ष तथा संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अॅड चिमण डांगे आदी नेत्यांनी दूरध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या.वाढदिवसानिमित्त कोणतेही सत्कार संभारभ व अनावश्यक खर्चाला फाटा देवून क्रिकेट स्पर्धा, रक्तदान शिबिर,यासारखे सामाजिक उपक्रम राबविल्याने जनतेतून समाधान व्यक्त होत आहे.
शुक्रवार सकाळपासून जत शहर व तालुक्याच्या विविध भागातून कार्यकर्त्यांची शुभेच्छा देण्यासाठी साहेबाचे निवासस्थान,पंचायत समिती कार्यालय बनाळी येथील कार्यक्रमस्थळी गर्दी झाली होती.काहीकाळ कार्यकर्त्यांनी मोठ्या गर्दी मुळे यात्रेचे स्वरूप आले होते. यावेळी भाजप नेते डॉ.रविंद्र आरळी, शिक्षण व आरोग्य सभापती तम्मण्णगौडा रवीपाटील, पंचायत समिती सभापती सौ.मंगल जमदाडे, उपसभापती शिवाजी शिंदे, भाजप गट नेते विजय ताड, चंद्रकांत गुडोड्डगी,आर पीआयचे पश्चिम महाराष्टाचे उपाध्यक्ष संजय कांबळे, माजी सरपंच लक्ष्मण बोराडे,मुचंडी सरपंच अशोक पाटील,युवक नेते बंडू चव्हाण सर,कॉट्रक्टर ए.ए.तेली.एस.पी.ननवरे,मार्कट कमिटीचे तज्ञ संचालक विठ्ठल निकम,बेंळोडगी सर्व सेवा सोसायटीचे चेअरमन सोमनिंग बोरामणी,व्रजवाड सोसायटीचे चेअरमन चिदानंद चौगुले,निगडी सोसायटीचे चेअरमन बाळकृष्ण शिंदे,माजी सरपंच प्रकाश इंगवले ,जोतिराम सावंत,येळवी सोसायटीचे चेअरमन महेश मालगत्ते,उद्योगपती नबीलाल मुजावर,महादेव जाधव,नवज्योत अॅग्रोटेकचे लिंबाजी सोलनकर प्रा.आबासाहेब सावंत,नारायण सावंत,सुनिल जाधव,राजू चौगुले, बेवणूरचे युवा नेते बाळासाहेब उर्फ मारुती वाघमोडे,रामराव विद्यामंदिर जत मधील सर्व प्राध्यापक ,दुय्यम बाजार आवार जत अधिकारी व कर्मचारी,प्रांताधिकारी तुषार ठोंबरे,पोलिस निरीक्षक राजू ताशिलदार ,उपअभियंता कुंडलिक उबाळे आदींनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्या दिल्या.
जत: माजी सभापती,भाजपचे जेष्ठ नेते प्रकाशरावजी जमदाडे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना आमदार विलासराव जगताप भाजपा नेते डॉ.रविंद्र आरळी,वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराचे आ.विलासराव जगताप यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.







