डफळापूर, वार्ताहर: बेंळूखी ता.जत येथील ओढापात्रात म्हैशाळ सिंचन योजनेतून गुरूवार पासून पाणी सोडण्यात आले.पहिल्यांदाच बेंळूखीच्या शिवारात कृष्णामाई आवतरल्याने ग्रामस्थांच्या वतीने संरपच वंसत चव्हाण यांच्या हस्ते नारळ फोडून पुजा करण्यात आली.बिंळूर कालव्याचे बेंळूखी पर्यत काम पुर्ण झाले आहे. गावाच्या पश्चिम भागात ओढापात्रा वरून जाणाऱ्या कॅनॉल मधून पाणी सोडण्यात आले. तेथून बोगरचौवडी तलावापर्यतचे बंधारे भरून पाणी तलावात सोडण्यात येत आहेत. गुरूवारी सायकांळी सर्व बंधारे भरून पाणी तलावात गेले आहे.या पाण्यामुळे पश्चिम भागातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. सर्व बंधारे, तलाव भरल्या नंतर शेती बहरणार आहे.त्यामुळे आवर्तनाचे पाणी तलावात पुर्ण क्षमतेने सोडावे अशी मागणी आहे.यावेळी संभाजी कदम,नानासाहेब चव्हाण,संजय पाटील, वंसत म्हणाणे,शिवाजी चव्हाण,रमेश चव्हाण, संभाजी चव्हाण टेलर, पोपट माळी,सागर पाटील,श्री.चंदनशिवे,कालिदास गुरव,दुडाप्पा म्हमाणे आदी मान्यवर उपस्थित होते.
Home Uncategorized डफळापूर | म्हैशाळ सिंचन योजनेचे पाणी बेंळूखीच्या शिवारात दाखल | www.sankettimes.com





