डफळापूर | दिग्विजय चव्हाण, बाबासाहेब भोसले, शिवाजी चव्हाण यांचा दत्त पतसंस्थेच्या वतीने सत्कार | www.sankettimes.com

0
4

डफळापूर,वार्ताहर: येथील श्री. दत्त पतसंस्थेच्या वतीने आयोजित पंचायत समितीचे सदस्य दिग्विजय चव्हाण यांच्या वाढदिवस,नेलकरंजीचे पहिले लोकनियुक्त संरपच बाबासाहेब भोसले यांचा,व एसटीच्या चालक सेवेतून सेवानिमित्त झालेले शिवाजी चव्हाण यांचा संयुक्तिक सत्कार सभारंभ उत्साहत संपन्न झाला.
दिग्विजय चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापण्यात आला,सोसायटीचे सदस्य श्री.अजित गायकवाड यांनी,संरपच बाबासाहेब भोसले यांचा बाजार समिती सभापती अभिजित चव्हाण, शिवाजी चव्हाण यांचा विजय चव्हाण यांच्या हस्ते शाल,श्रीफळ व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. यावेळी मराठा स्वराज्य संघाचे जिल्हाध्यक्ष सुभाषराव गायकवाड यांनी तिंन्ही मान्यवराचा सत्कार केला.सोसायटीचे माजी चेअरमन मनोहर भोसले, राजकुमार भोसले, जिरग्याळचे संरपच दिपक लंगोटे,ग्रा.प.सदस्य सुनिल गायकवाड, देवदास पाटील, ए.एन.खतीब, वंसत पाटील,प्रविण पाथरूट,खलाटीचे उपसंरपच शहाजी जाधव,आंनदा शिंदवडे,सिध्दू गावडे,भारत गायकवाड, आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन दत्त पतसंस्थेचे चेअरमन बाबासाहेब माळी, सिध्दिविनायक पतसंस्थेचे चेअरमन अजित भोसले यांनी केले.सुत्रसंचालन महेश चव्हाण यांनी केले.

दत्त पतसंस्थेच्या वतीने वाढदिवसानिमित्त दिग्विजय चव्हाण यांचा,नेलकरंजीच्या संरपचपदी निवड झाल्याबद्दल बाबासाहेब भोसले, व एसटीच्या चालक सेवेतून सेवानिमित्त झाल्याबद्दल शिवाजी चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here