जत | तालुक्याला पुन्हा वादळांचा तडाखा शुक्रवारी सायकांळी पुन्हा हाहाकार : सुमारे 50 घराचे नुकसान, झाडे कोसळली | www.sankettimes.com

0
4

जत,प्रतिनिधी: जत तालुक्यातील शहरासह अनेक गावांना शुक्रवारी पुन्हा वादळी वाऱ्यांचा तडाखा बसला.शुक्रवारी सायंकाळी वादळी वाऱ्यांसह आलेल्या मुसळधार पावसाने झोडपून काढले.जत शहर,सोन्याळ पट्ट्यात वादळी वाऱ्यांने हाहाकार माजवला.शहरातील अनेक घराचे पत्रे उडाले आहेत. तर सोन्याळ परिसरात मोठी हानी झाल्याचे वृत्त आहे.परिसरातील अनेक घरे, गोठे,उडाले आहेत.जुनी झाडे ही कोसळली आहेत.वादळामुळे सोन्याळ परिसरात सुमारे 50वर शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून तातडीने पंचनामे करून मदत द्यावी अशी मागणी सोन्याळचे विजयकुमार बगली यांनी केली आहे. तातडीने पर अचानकपणे विजांच्या कडकडाटासह संपूर्ण तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. त उकाडा होता. त्यामुळे उकाड्याने जतकर हैराण झाले होते. त्यामुळे आज सायंकाळी सुरू झालेल्या अवकाळी पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या जतकरांना दिलासा मिळाला आहे. मात्र या पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचून राहिले होते. यामुळे वाहनधारकांना कसरत करावी लागली. तर या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला 

जत शहरातील वादळी वाऱ्यांमुळे घराचे पत्रे उडाले आहेत.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here