जनसामान्याचा नेता, युवकांचे आयडॉल – दिग्विजय चव्हाण

0
14

डफळापूर साऱख्या प्रगतशील गावात स्वर्गीय सुनिल बापू चव्हाण नावाचं मुशीतून तयार झालेले व बापूच्या पश्चात समर्थपणे वारसा चालविणारे विद्यमान पंचायत समिती सदस्य दिग्विजय चव्हाण यांचा आज वाढदिवस त्यानिमित्त त्यांच्या कार्याचा थोडक्यात माहिती…

जत पश्चिम भागातील कॉग्रेसचे ताकतवान नेते सुनिल बापू चव्हाण यांनी तालुक्यात वेगळ वलयं तयार केले होते. असंख्य कार्यकर्ते , मोठा समर्थक जनसमुदाय , जनतेसाठी काम करण्याची उर्मी त्यांच्या पश्चात पेलणे अवघड काम अगदी कॉलेज जिवनात नियतीने सुनिल बापूचे जेष्ठ चिरजिंव दिग्विजय यांच्याकडे आले होते. हे सर्व करताना बापूची तत्वे,व वेगळा पायंडा जपत दिग्विजय यशस्वी झालेत. नुसते नव्हे तर त्यांच्या सारखे जनतेचे वलयं निर्माण करत अगदी लहान वयात कॉग्रेस पक्षाकडून दिलेली पंचायत समितीच्या निवडणूकीची उमेदवारी पासून विजयापर्यत नेहत त्यांनी सर्वांची मने जिंकली आहेत. बापूनंतर तालुक्यातील सुनिल बापू गटाला बंळकटी देण्यासाठी ते महत्वपुर्ण भूमिका बजावत आहे. मतदार संघातील जनतेसाठी सदैव उपलब्धं राहत दिग्विजयनी स्वत:ला सिध्द केले आहे. यापुढे डफळापूरतील सुनिल बापू गट किंबहुना कॉग्रसचे नेते म्हणून त्यांचे काम डफळापूरला विकासाकडे नेहील.

अगदी लहान वयातं पंचायत समिती सदस्य झालेले दिग्विजय आज युवकांचे आयडॉल बनले आहेत. डफळापूर पाणी नळपाणी योजना,म्हैशाळ सिंचन योजना ,रस्ते , अनेक योजनानां पाठपुरावा करत आहेत. ते भविष्यात डफळापूरचे नवनिर्माण केल्याशिवाय थांबणार नाहीत एवढे मात्र नक्की

जनसामान्याचा नेता 

डफळापूर परिसरातील जनतेला स्वाभिमानाने जागविणारे उर्जास्ञोत जागविण्यासाठी कठिबध्द व्यक्तिमहत्व, वारसा हक्काने अनेकांना मोठेपणा मिळतो ; मात्र तो समर्थपणे पुढे चालवणे सर्वांनाच जमते असे नाही.मात्र हे अवघड काम लोकनेते सुनिल बापू चव्हाण यांचे चिरजिंव दिग्विजय चव्हाण यांनी करून दाखविले आहे.

जनमाणसाची तळमळ व कायम जनहितासाठी काम करणाऱ्या दिग्विजय चव्हाण यांची डफळापूर परिसरातील जनमाणसाचा नेता छबी तयार झाली असून सामान्य जनतेच्या सुख दु:खात सामिल होणारे दिग्विजय चव्हाणभविष्यातील मोठे राजकीय प्रस्थ असणार आहेत.

अगदी लहान वयात जतच्या राजकारणात इंट्री करून त्यांनी भविष्यातील दिशा स्पष्ट केल्या आहेत.पंचायत समिती सदस्य म्हणून अगदी अल्पवयात वेगळेपण जपले आहे.जनतेच्या प्रश्नासाठी पंचायत समिती सभागृहात विषय ठासून मांडणारे दिग्विजय स्व.सुनिल बापूची आठवण करून देतात.बापूच्या पश्चात जत पश्चिम भागात राजकारणात जेष्ठ बंन्धू बाजार समिती संचालक अभिजित चव्हाण यांच्या बरोबर वेगळा ठसा उमटविला आहे.जनतेची तळमळ,लोकहित यामुळे दिग्विजय चव्हाण लोकांचे नेते बनले आहेत.

– रणजित भोसले , (गर्व्हरमेंट रजिस्टर कॉट्रक्टर)

दिग्विजय चव्हाण यांच्या पाठपुराव्याने विकास योजना खेचून आणल्या

* मिरवाड,खलाटी,शिंगणापूर आरोग्य उपकेंद्रासाठी प्रत्येकी 50 लाखाचा निधी मिळाला आहे. मिरवाड,खलाटीचे काम प्रगतीपथावर आहे. शिंगणापूर जागेमुळे थांबले होते.त्या केंद्राचे काम लवकरचं सुरू होईल

*मिरवाड तलाव दुरूस्थीसाठी साडेदहा लाखाचा निधी उपलब्धं झाला आहे, काम प्रगतीपथावर आहे

*डफळापूर पंचायत समिती मतदार संघात 8 घरकूले,4 कडबा कुटी मशिन,1 चारचाकी सायकल,4 पिठाच्या गिरणी मिळवून दिल्या.पाठपुराव्यामुळे मतदार संघातील तीस शालेय मुलींना सायकली देण्यात आल्या आहेत.

*खलाटी पाणी योजनेचा मुख्यंमञी पेयजेल योजनेत समावेश करून घेतला.त्यामुळे गतीने निधी मिळून काम लवकरचं मार्गी लागणार आहे.

*डफळापूर पेयजेल योजनेच्या कामासाठी सतत पाठपुरावा सुरू आहे, योजनेला निधी उपलब्धं झाला आहे. विजेच्या डांबाचे टेंडर निघाले आहे.काम प्रगतीपथावर असून मार्च अखेरपर्यत डफळापूर गाव भागाला पाणी सुरू होईल.

*डफळापूर येथे सुसज्ज बसस्थानक उभारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

*डफळापूर सह परिसरातील नागरिकांचे समस्या सोडविण्यासाठी कायम उपलब्धं असतात.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here