तुमची स्वतःवर आणि आपण स्विकारलेल्या मार्गावर गाढ श्रध्दा असेल, तर तुम्ही या जगात अशक्य ते शक्य करुन दाखवाल. स्वीकार ही सर्वोत्तम गोष्ट आहे आणि स्विकारलेल्या मार्गावरुन सातत्याने पुढे जात राहणारी माणसं निश्चित यश मिळवित असतात. या न्यायाने अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत, आपल्या एकुण सामाजिक, राजकीय वाटचालीत, अनेक अडथळ्यांना तोंड देत..अडथळ्यांमूळेच आपल्यातील तेज व्यक्त करीत, शून्यातून कर्तृत्व सिध्द करणारे एक आगळे- वेगळे नेतृत्त्व म्हणजे प्रकाशरावजी जमदाडे(साहेब).
कायम दुष्काळ पाचवील्या पूजलेल्या, फोंड्या- ओसाड माळरानातील येळवीसारख्या एका गावात सर्वसामान्य कुटूंबात जन्म घेऊन, अंगभूत बौध्दीक चमक, अमोघ- वैविध्यपूर्ण पण व्यासंगी वक्तृत्व, अफाट कष्ट घेण्याची सवय, मनमिळावू स्वभाव, संघटन कौशल्य, विनम्रता आणि माणसं पारखण्याची निसर्गदत्त बुध्दी आणि कोणाच्याही संकटसमयी धावून जाण्याची उपजत वृत्ती, हाती घेतलेल्या कामाची तड लावण्याची सवय..अशा अनेक गुणांच्या जोरावर जमदाडे साहेबांनी जत तालूक्याच्या समाजकारण- राजकारणात आपली ओळख निर्माण केलेली आहे.
“आपल्या जिव्हाळ्याचा विषय कोणता आहे, हेच अनेकदा आपल्याला कळत नाही. त्या प्रांतात रोज किमान सात- आठ तास काम करीत चला. केवळ एकच दिवस नव्हे जवळजवळ दहा वर्षे सातत्याने रियाझ करा, मग त्या प्रांतातील सर्वोच्चता सिध्द व्हायला वेळ लागत नाही.” हा नियम साहेबांच्या बाबतीत तंतोतंत लागू होतो. समाजकारण व राजकारणात सर्वस्व झोकून काम करण्याच्या त्यांच्या धडाडीमूळे जत तालुक्यातील सर्व घटकांतील जनतेच्या समस्या त्यांना मुखोदगत आहेत. तालूक्याच्या प्रश्नांवर भांडताना, त्यांचा व्यासंग त्यांच्या वक्तव्यातून चकाकताना वारंवार दिसतो. “हातात कागदाच्या चिठोर्या न घेता आकडेवारीसह तालुक्याच्या समस्या व झालेली सोडवणूक…यांची इत्थंभूत माहिती देणारा लढवय्या युवानेता..अशी त्यांची प्रतिमा त्यांच्या बहुआयामी व्यक्तीमत्त्वाची पुरेशी ओळख करुन देणारी आहे.
गेल्या 25 वर्षाहून अधिक काळ अखंड उत्साह, अविरत काम, संघटनात्मक बांधणी, प्रचंड लोकसंग्रह, मिळेल त्या संधीचे सोने करण्याची धडाडी, सामान्यांच्या न्याय-हक्कासाठीचा आक्रमकपणा, अभ्यासपूर्ण संघर्ष, जीवनदृष्टी आणि प्रत्यक्ष जीवन यांचा समन्वय साधण्यात आलेले यश, कर्तृत्त्वाने पदाची प्रतिष्ठा वाढविण्याची धमक…अशा अनेक आयामांचे, बहुआयामी व्यक्तिमत्त्व असणार्या मा. प्रकाशरावजी जमदाडे(साहेब) यांना पुढील सामाजिक, राजकीय वाटचालीच्या..या वाढदिवसाच्या निमित्ताने मनापासूनच्या शुभेच्छा!
Home Uncategorized “कर्तृत्त्वाने पदाची प्रतिष्ठा वाढविण्याची धमक असणारा लढवय्या नेता”—मा. प्रकाशरावजी जमदाडे





