जत | वादळामुळे जत तालुक्यातील नुकसानीचा आकडा कोटीवर महसूल विभागाकडून पंचनामे सुरू : सर्वाधिंक निगडी खुर्द येथे हानी ; महसूलची तुटपुंजी मदत

0
7

जत,प्रतिनिधी : सोमवारी सायकांळी साडेपाच सुमारास आलेल्या वादळाचा मोठा तडाखा बसला आहे.जत शहरासह निगडी खुर्द, वायफळ,सनमडी, कुणीकोणूर,जाड्डरबोबलाद, सोन्याळ, येळवी,आदी भागात घराचे मोठे नुकसान झाले आहे.तालुक्यातील सर्व गावातील नुकसानीचा आकडा 1 कोटीवर जाण्याची शक्यता आहे. महसूल विभागाकडून मंगळवारपासून पंचनामे करण्यात येत आहेत.पुढील दोन दिवस पंचनामे करावे लागतील इतकी घरे,गोठे व शेतीसाहित्याचे नुकसान झाले आहे.वादळी वाऱ्यामुळे तालुक्यातील वेगवेगळ्या ठिकाणचे विजेचे 44 ,तर पवऊर्जा कंपनीचे 11 विद्युत खांब कोसळल्याने ऐन उन्हाळ्यात मंगळवारी जत शहरासह तालुक्यातील अनेक गावाचा विजपुरवठा खंडीत होता.अनेक ठिकाणी जोड वाहिन्याना जोडणारे कडेशनर फुटल्याचे संख विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.त्यामुळे शहरातील वादळाने बाधित गावातील नागरिंक घामाघुम झाले.अनेक गावात रात्री उशिरापर्यत विजपुरवठा खंडीत होता.वादळात महावितरणचे सुमारे आठ लाखाचे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यांमुळे तालुक्यातील जत शहर सह दक्षिण भागातील अनेक गावात घराचे पत्रे उडाले आहेत, काहीचे गोठे पडले,अनेक जुनी घरे कोसळली आहेत.जत शहर, निगडी, येळवीे, काराजनगी, वायफळ भागात महसूल विभागाकडून सायकांळ पर्यत पंचनामे करण्याचे काम सुरू होते.निगडी खुर्दला वादळाचा मोठे फटका बसला आहे. तेथे जवळपास 100 घराचे नुकसान झाले आहे. तेथील नुकसानीचा आकडा सत्तर लाखापर्यत पोहण्याची शक्यता आहे. घराचे पत्रे उडाल्याने अनेक कुंटुबिये उघड्यावर आली आहेत. निगडी खुर्द येथे प्रांताधिकारी तुषार ठोंबरे, तहसीलदार अभिजित पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली.पंचनामे करणाऱ्या अधिकाऱ्यांना सुचना दिल्यात.नुकसान ग्रस्त कुंटुबियांना तातडीने मदत द्यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

दरम्यान जत तहसिलदार कार्यालयाकडून तुटपुंजी धान्याची मदत केली जात आहे. त्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे.

जत : सोमवारी जत तालुक्यात झालेल्या वादळी वाऱ्यांमुळे घराचे पत्रे उडून असे विद्युत खांबावर अडकले होते,अनेक घराचे पत्रे उडाले आहेत. जत महसूल विभागाकडून तातडीने पंचनामे करण्यात येत आहेत.निगडी खुर्द येथे प्रांताधिकारी तुषार ठोंबरे, तहसिलदार अभिजित पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here