जत | बिंळूर मध्ये निवडणूकीच्या वादातून दोन गटात राडा | www.sankettimes.com

0
52

जत,प्रतिनिधी : बिंळूर ता.जत येथे ग्रामपंचायत निवडणूकीत विजयानंतर दोन गटात राडा झाला.विजयी उमेदवारांच्या मिरवणूकी समोरून जाणाऱ्या विरोधी गटाच्या एकाची इनिव्हा गाडीची काच फोडून 15 हाजार रूपयाचे नुकसान केल्याची तक्रार जत पोलिसात दाखल झाली आहे.
सायकांळी सातच्या सुमारास घटना घडली.याबाबतची विरोधी गटाच्या लक्ष्मण बसगोंडा जकगोंड यांने दिलेल्या तक्रारीवरून पंचवीस जणावर गुन्हा दाखल झाला आहे.
जकगोंड यांने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, इनिव्हा गाडी(एमएच-14,डीटी-5341) ही गाडी मुदगाप्पा कुंच्ची यांच्या घराजवळील बोळात लावली असता मिरवणूकीतील काही जणांनी गाडीवर दगडफेक करून गाडीची मागील काच फोडून 15 हाजाराचे नुकसान केले.त्याचबरोबर माझ्या घरासमोर फटाके वाडवून आरडाओरडा केला.तसेच माझ्या विरूध अर्ज का भरलास म्हणत जिवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here