निगडी | जतला वादळाचा तडाखा : दोन ठार सुमारे 25 जण जखमी,100 हून जास्त घरांचे नुकसान,अनेक वृक्ष कोसळले

0
14

निगडी,सोन्याळ, वार्ताहर : जत दक्षिण,पुर्व भागात पूर्व मोसमी पावसाने जत तालुक्यात थैमान घातलं आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात वीज कोसळून एक,तर घर पडल्याने एका महिलेचा मुत्यू झाला.तर त्याच घरासह अनेकजण जखमी झाले आहेत. जाड्डरबोबलाद मधील शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. तर निगडी खुर्द येथील वाऱ्यामुळे पुर्ण घरचं पडल्याने एका महिलेचा मुत्यू झाला तर घरातील अन्य जण जखमी झाले आहेत.जाड्डरबोबलाद येथील शेतकरी भीमराय शिवाप्पा हिचंगेरी यांचा विज पडून तर निगडी खुर्द येथील अंबुबाई जगताप यांच्या अंगावर घर पडल्याने मुत्यू झाला आहे.
तालुक्यातील निगडीला वादळी वाऱ्याचा सर्वाधिंक फटका बसला आहे. या गावातील सुमारे पंचवीसवर घरांचे नुकसान झाले आहे. तर पवऊर्जा,महावितरण कंपनीचे विजेचे खांब रस्त्यावर पडल्याने संपर्क तुटला आहे.त्याचबरोबर मोठ मोठे वृक्ष कोसळल्याने मोठी हानी झाली आहे. वादळी वाऱ्यांचा मोठा फटका निगडी खुर्द ला बसला आहे. निगडी अंबुबाई जगताप यांचे संपुर्ण घरच कोसळले. त्यात आंबूबाई जगताप यांचा मुत्यू झाला आहे. त्यांची सुन दिपाली जगताप,ही गंभीर जखमी झाली आहे. साहेब कोळी यांचे कोंबडी शेड उडाले आहे.त्याचबरोबर घराचे पत्रे उडून तात्यासाहेब कोळी,त्यांची आई चंदाबाई कोळी जखमी झाली.नानासाहेब सांवत यांचे घर पडून पत्नी संगीता सांवत जखमी झाल्यात,गणेश महादेव मोरे यांच्या डोक्यात दगड पडल्याने गंभीर जखमी झाला आहे. जत येथील खाजगी दवाखान्यात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.बाळासो एकनाथ शिंदे यांच्या घराचे पत्रे उडाले आहेत.दरम्यान अंबुबाई जगताप यांच्या आकस्मित निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.
दुपारपासूनच सर्वत्र ढगाळ वातावरण होतं. वातावरणात प्रचंड उकाडा वाढला होता. जत शहर आणि परिसर, ग्रामीण भाग यात पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. मात्र जत तालुक्यातील निगडी खुर्द सह येळवीे, सनमडी, सोन्याळ, जाड्डरबोबलाद, सह अनेक भागात जोरदार वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली.यात जाड्डरबोबलाद या गावाच्या शिवारातील शेतकरी वीज पडून शेतकरी भीमराय शिवाप्पा हिचंगेरी (वय-45)यांच्यावर वीज कोसळून त्यांचा मृत्यू झाला.

तालुक्यातील शंभरावर
घरावरचे पत्रे उडून शेतकऱ्यांचं नुकसान

वाऱ्याचा जोर जास्त असल्याने अनेक झाडे पडली, तसेच पवऊर्जा, महावितरण कंपनीचे विद्युत खामब कोसळले आहेत. वाऱ्याचा जोर वाढल्याने घरावरील पत्रे उडून गेले आहेत.निगडी खुर्द गावातील अनेक घरावरचे पत्रे उडून गेल्याने घजाड्डरबोबलादमय भिजून लाखोंचं नुकसान झालं आहे.

वादळी वाऱ्याने येळवीत मोठे नुकसान

येळवी,वार्ताहर:
येळवीे परिसरात सोमवारी सायकांळी आलेल्या वादळी पावसाने मनगेनी ज्ञानू काळे व बिरा ज्योती काकडे यांचे राहते घराचे पत्रे उडून मोठे नुकसान झाले आहे.त्याचबरोबर अनेक विजेचे खांब कोसळल्याने अनेक गावे अंधारात बुडाली आहेत.

सोन्याळ ता.जत येथे घरावर झाडे कोसळल्याने मोठी हानी झाली आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here