जत | 5 ग्रामपंचायतीच्या व पोटनिवडणूकीत शांततेत मतदान | www.sankettimes.com

0
7

जत,प्रतिनिधी: जत तालुक्यातील 5 ग्रामपंचायतीच्या व पोटनिवडणूकीत झालेल्या पंचवार्षिक निवडणूकीत किरकोळ घटना वगळता कोणताही अनुसुचित प्रकार न घडता शांततेत मतदान पार पडले.उमदी, कोतेबोबलाद, गुंलगुजनाळ, बिंळूर, खिलारवाडी येथे मतदान झाले.त्या अतिसवेंदनशील कोतेबोबलाद गावात चुरसीने झालेल्या प्रचारामुळे 81 मतदान झाले आहे.एकूण 2893 मतदारापैंकी 2335 मतदारांनी हक्क बजावला.आमदार विलासराव जगताप यांचे गाव असल्याने येथील निवडणूक चुरसीने झाले.कॉग्रेस नेते विक्रमसिंह सांवत व जगताप गटात थेट सामना झाला.आज मतमोजणी नंतर चित्र स्पष्ट होणार आहे.

बिळूर येथे 70 टक्के खिलारवाडी 87 टक्के मतदान (फक्त सरपंच पदासाठी निवडणूक सदस्य बिनविरोध),कोंत्याबोबलाद येथे 81.20 टक्के, गुंलगुंजनाळ येथे 88 टक्के,उमदी येथे 77.14 टक्के अशी सरासरी 80 टक्के तालुक्यात मतदान झाले आहे. सर्वात जास्त मतदानाची टक्केवारी खिलारवाडी येथे तर कमी बिळूर मध्ये आहे.याठिकाणी मतदाराची उदासनिता दिसून आली.भर उन्हात देखील काही मतदान केंद्रावर तुफान गर्दी होती.मतदानकरिता दुपारी 4 वाजलेनतर वेग आला.

            निवडणूकी पोलिस यंत्रणेने चोख बंदोबस्त ठेवला अतिसंवेदनशील उमदी,बिळूर,कोंत्याबोबलाद या गावासह अन्य गावात कडक बंदोबस्त तैनात केला होता.त्यामुळे कोठेही अनुसुचित घटना घडली नाही. मतमोजणी आज तहसीलदार कार्यालय जत समोरील धान्य गोदामात होणार आहे.त्याकरिता निवडणूक विभागाने तयारी केली आहे.

या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे आज स्पष्ट होणार आहे.आता फक्त निकालाची धाकधूक,उत्सकता शिगेला पोहोचली आहे.तालुक्याचे लक्ष निकाल कडे लागले आहे. किरकोळ प्रकार वगळता कोठेही अनुचित प्रकार घडला नाही.मतदान शांतेत पार पडले .

उमदी,बिंळूर येथे दुपारी भर उन्हात देखील मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी होती.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here