बनाळी वार्ताहर: बनाळी येथील श्री.बनशंकरी मदिंरासमोर ग्रामपंचायतीच्या वतीने हॅलोजन लॅम्पचा टॉवर उभा केला आहे. त्यामुळे मदिंर परिसर झळलला आहे.रात्रीच्या सुमारास येणाऱ्या भाविकांना यामुळे फायदा होणार आहे. तालुक्यातील जागृत्त देवस्थान म्हणून श्री.बनशंकरी देवस्थान परिचित आहे. भाविकांचीही ये-जा मोठ्या प्रमाणात असते.मंदिर परिसरात शुशोभिकरण, बांधकामे करण्यात आली आहेत. लग्न सोहळे,धार्मिक कार्यक्रम येथे होतात.त्यामुळे रात्री उशिरापर्यत भाविकांची गर्दी असते.मंदिर परिसरात विजेची समस्या होती. बनाळी ग्रामपंचायतीने यांची दखल घेत फिलिप्स कंपनीचे उच्च श्रेणीचे हॅलोजन लॅम्प असलेला टॉवर अभा केला आहे. टॉवरची जादा उंची,चोहोबाजूनी चार हॅलोजन असल्याने मंदिर परिसर प्रकाशमय झाला आहे.
बनाळी मंदिर परिसरीत हॅलोजन लॅम्पचा टॉवर उभारल्याने परिसर प्रकाशमय झाला आहे.





