जत | बेकायदा दारू वाहतूक: दीड लाखाचा मुद्देमाल जप्त बिंळूर-खिलारवाडी रस्त्यावर केली कारवाई: एकजण ताब्यात

0
6

जत,प्रतिनिधी : बिंळूर ग्रामपंचायत निवडणूकीच्या पाश्वभूमीवर गस्त घालणाऱ्या पोलिस पथकाने बेकायदेशीर दारू वाहतूक करणाऱी इंडिका गाडी पकडली.बिंळूर-खिलारवाडी रोडवर सायकांळी सहाच्या दरम्यान ही कारवाई करण्यात आली.इंडिका गाडी,47 दारू बॉटलसह चालक राजू मल्लाप्पा कामगोंडा(वय-37) याला पोलिसांनी ताब्यात घेत एक लाख 52 हाजार 444 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.
बिंळूर ग्रामपंचायत निवडणूकीच्या पाश्वभूमीवर कायदासुव्यस्था बिघडू नये म्हणून जत पोलिसचे पथके गस्त घालत असताना बिंळूर-खिलारवाडी रोडवर (एमएच-11,एके-1838) ही इंडिका गाडी संशास्पद आढळूंन आली.गाडीला अडवत चालकास हाटकले असता तो पळून जाण्याच्या स्थितीत त्याला पकडत इंडिका गाडीची तपासणी केली,गाडीत विना परवाणा आणलेल्या बॉक्समध्ये 47 देशी दारूच्या बॉटल सापडल्या.निवडणूकी दरम्यान बिंळूर व परिसरात ही दारू विक्री होण्याची शक्यता होती.त्याअगोदर सा. पोलिस निरिक्षक रणजित गुंडरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.गाडी,चालक व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबतचा गुन्हा जत पोलिसात दाखल झाला आहे.पथकात राजू कांबळे, रामेश्वर पाटील, अभिजित यमगर यांच्या़ समावेश होता.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here