संख | अपघातातील जखमी गजानन बिरादार यांचे निधन | www.sankettimes.com

0
6

संख,वार्ताहर:संख (ता.जत) येथील अपघातातील जखमी गजानन शामराव बिरादार (रा.भिवर्गी,वय 26)यांचे उपचार सुरू असताना शुक्रवारी निधन झाले.
11 मे रोजी भिवर्गी येथून माडग्याळ येथील बाजारात शेळी विकण्यासाठी बिराजदार व त्यांचा मित्र निघाले होते.दरम्यान संख गावातील रोडवर गावातून मुख्य रस्त्यावर येणाऱ्या जेसीबी व दुचाकीची भिषण धडक झाली होती. त्यात बिराजदार यांना गंभीर दुखापत झाली होती. त्यात पोटात जेसीबीचे दात घुसले होते. त्यामुळे त्यांची प्रकृत्ती चिंताजनक होती.त्याच्यांवर सांगली येथील शासकीय रूग्णालयात उपचार सुरू होते.शनिवारी चार वाजता अखेर बिराजदार यांची प्राणज्योत मावळली. गजानन बिरादार यांच्या पश्चात वडील,दोन भाऊ,पत्नी व 5 महीन्याचा मुलगा असा परिवार आहे. गजाननचे लग्न होऊन दीड वर्षे झाले होते.त्यांच्या निधनाने बिराजदार कुंटुबियावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here