जत,प्रतिनिधी: जत शहरातील गांधी चौक येथील नगर पालिका कॉप्लेक्स मधील सागर माने यांच्या ज्योतिर्लिंग मोबाईल शॉपीचे शटर कटावनीने उचकटून दुकानातील सुमारे 30 हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात तीन चोरट्यानी लंपास केला,ही घटना मंगळवारी रात्री दोन वाजण्याच्या दरम्यान घडली.दरम्यान तपास लागत नसल्या कारणाने पोलिसात गुन्हा दाखल झाला नाही.चोरटे सत्तूर,तलवारी सारखे हत्यारे घेऊन दशहत माजवत चोरी करत असल्याने शहरात भितीचे वातावरण निर्माण झाली आहे.
घटनास्थावरून मिळालेली माहिती अशी की,शहरातील हानुमान मंदिरापाठीमागील नगरपालिका कॉम्पलेक्समध्ये शिवसेनेचे नेते विजय चव्हाण यांच्या दुकान गाळ्यात माने हे मोबाईल विक्री,दुरूस्थीचे दुकान चालवतात. मंगळवारी रात्री ते दुकान बंद करून गेल्यानंतर रात्री दोन वाजण्याच्या दरम्यान अज्ञात तीन चोरटे शटर उचकटत असताना अज्ञाताने फोन करून यांची माहिती चव्हाण यांना दिली. ते घरातून उठून तेथे येईपर्यत एक चोरटा दुकानात तर एक चोरटा शंभर फुटावर हत्यारबंध टेहाळणी करत होता,तर एकजण बँकेसमोरील उमराणी रोडकडे जाणाऱ्या बोळात दुचाकी घेऊन उभा होता.चव्हाण तेथे एकटे आल्यानंतर त्यांनी शटरला हात लावला तोपर्यंत इतर दोन चोरटे धारदार सत्तुर घेवून चव्हाण यांच्या अंगावर धावून आले.एकटे असणाऱ्या चव्हाण यांनी बचावत्मत पवित्रा घेत मागे हटले.तोपर्यत बाहेरील दोघांनी शटर वाजवून दुकानमध्ये चोरी करणाला बोलवत पाच किंमती नवीन मोबाईल,तिन रिपेअरीसाठी आलेले जुने मोबाईल , एक राऊटर असा सुमारे तीस हजार रुपयांचा मुद्देमाल घेवून पलायन केले.दरम्यान चव्हाण यांचे मित्र व भाऊ तेथे आले त्यांनी चोरट्यांचा पाठलाग केला.परंतु ते सापडले नाहीत.चोरट्यानी दुकानातील रोख पैशाला हात लावला नाही. चव्हाण बाहेर येवून थांबल्यामुळे गडबडीत फक्त मोबाईल घेवून त्यांनी पलायन केले आहे.यापुर्वी बाजार पेठेतील महावीर हार्डवेअर, बाबुराव पट्टणशेट्टी यांचे किराणा दुकान व आता ज्योतिर्लिंग मोबाईल शंपी अशा तीन दुकाने फोडून रोखड,दुकांनातील माल लंपास केला आहे. पोलिसांचा ससेमिरा नको म्हणून यापैंकी एकानेही जत पोलिसात आजपर्यंत तक्रार दाखल केली नाही. पोलिसांनी रात्रीची गस्त सुरू करून चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी व्यापारी वर्गातून होत आहे.
Home Uncategorized जत | शहरातील मोबाईलचे दुकान फोडून तीस हजाराचे मोबाईल पळविले | www.sankettimes.com





