शेगाव | (चप्रासवाडी)तलाव कामाची पाहणी | www.sankettimes.com

0
3

शेगाव, वार्ताहर: शेगाव (चप्रासवाडी) तलाव दुरूस्थीसाठी छोटे पाटबंधारे विभाग,जि.प.सांगली यांच्या वतीने आलेल्या निधीतून काम गतीने सुरू आहे. दुरूस्थी कामासाठी जि.प.सदस्या सौ.स्नेहलता जाधव व अॅड.प्रभाकर जाधव यांच्या प्रयत्नातून सुमारे तेविस लाखाचा निधी मिळाला आहे.यातून तलावाच्या बांधाचे मजबुतीकरण,पिंचिग,बांधावरील झाडे काढणे,त्याशिवाय अन्य कामे होणार आहेत. तलावातील झिरपणारा पाणी साठा या कामामुळे थांबणार आहे.त्यामुळे तलावात जास्त पाणी उपलब्धं होईल.कायम लोकहितासाठी काम करणाऱ्या अॅड.जाधव यांनी मतदार संघात शेतकरी हिताला प्राधान्य दिले आहे. त्याच्याच भाग म्हणून तलावाचे मजबुती करणासाठी ते प्रयत्न करत आहेत. त्याशिवाय म्हैशाळ सिंचन योजनातून परिसरातील तलावे पुर्ण क्षमतेने भरावेत यासाठी योजनेच्या अधिकाऱ्याकडे पाठपुरावा करत आहेत. नुकतीच तलावाच्या कामाची पाहणी अॅड.जाधव,उपसंरपच दत्ता व्हमाने,ग्रा.प.सदस्य गुंडा माऩे,श्री.बुरूटे,जि.प.चे कार्यकारी अभियंता श्री.गायकवाड, उपअभियंता श्री.कांबळे यांनी पाहणी केली.

शेगाव येथील तलाव दुरूस्थीकामाची पाहणी करताना अॅड.प्रभाकर जाधव कार्यकारी अभियंता श्री. गायकवाड, उपअभियंता श्री. कांबळे आदी

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here