जत,प्रतिनिधी : जत शहरातील विजापूर-गुहागर रोडवरील सोनलकर चौकातील धोकादायक ठरलेले खड्डे अखेर जागर फाऊडेंशनच्या वतीने मुरूम टाकून भरण्यात आले.प्रशासनाच्या भोगळ कारभारामुळे जत शहर पुर्णत:खड्डेमय बनले आहे. शहरातील सोनलकर चौकात भले मोठे खड्डे पडले आहेत. त्यात नगरपालिकेच्या गटारीचे पाणी आल्याने ते डबके बनले होते.त्यामुळे गेल्या चार दिवसात काही महिला,नागरिंक व दुचाकी स्वार या खड्ड्यात पडले आहेत. तीन-चार फुटाच्या या खड्ड्यात पाणी थांबल्याने रस्त्यातून जाताना कसरत करण्याची वेळ वाहन चालकावर आली होती.त्याशिवाय नागरिकांनाही मोठ्या अडचणील् सामोरे जावे लागत होते.दोन दिवसात एक महिला,चार-पाच नागरिंक या खड्ड्यात पडले आहेत.अनेक दुचाकी,लहान वाहने घसरली आहेत.यांची माहिती पालिकेचे माजी बांधकाम सभापती तथा लोकसेवक परशूराम मोरे यांना काही लगतच्या नागरिंक व व्यापाऱ्यांनी दिली.व यावर उपाययोजना करण्याची विंनती केली.कायम जनहितासाठी काम करणाऱ्या मोरे यांनी स्वता:च्या खर्चातून तातडीने काही खेपा मुरूम आणत खड्डे भरले.यामुळे किमान या खड्ड्यातून तरी नागरिकांची मुक्ती झाली आहे.सामाजिक हित जपत प्रंसगी स्वता:चे पदरमोड करून काम करणाऱ्या परशूराम मोरे यांच्याविषयी समाधान व्यक्त होत आहे. दरम्यान जत शहरातील नागरिकांना अत्यंत अडचणीच्या रस्त्यावरील खड्डे जागर फाऊडेंशनच्या वतीने वतीने भरणार असल्याचे यावेळी मोरे यांनी सांगितले.
जत शहरातील सोनलकर चौकातील धोकादायक ठरलेले खड्डे लोकसेवा परशूराम मोरे यांनी स्व:खर्चातून मुरूम टाकून भरले.





