उमदीच्या सर्वागिंन विकासासाठी सत्ता द्या: अॅड.चन्नाप्पा होर्तीकर | www.sankettimes.com

0
7

उमदी,वार्ताहर: उमदीच्या सर्वागिंन विकासासाठी राष्ट्रवादी कॉग्रेस व भाजपच्या पँनेलच्या थेट संरपच व सदस्यांना बहुमतांनी विजयी करा असे आवाहन राष्ट्रवादीचे नेते अॅड. चन्नाप्पा होर्तिकर यांनी प्रचार सभेत केले.
पँनेलच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ सभेत ते बोलत होते. यावेळी भाजप नेते संजयकुमार तेली राष्ट्रवादी कॉग्रेस व भाजपचे थेट संरपच व सदस्य पदाचे उमेदवार उपस्थित होते.
होर्तीकर पुढे म्हणाले,उमदीत सत्तेच्या माध्यमातून मोठी विकासकामे केली आहेत.लोकहितासाठी कायम प्राधान्य दिल्याने मतदारांनी आमच्या विश्वास कायम आहे.उमदीला तालुका निर्मिती,स्वंतत्र अप्पर तहसिल कार्यालय सह अनेक मोठी कामे करायची आहेत.त्यासाठी आमच्या पँनेला विजयी करा असे आवाहन होर्तीकर यांनी शेवटी केले.
संजयकुमार संजयकुमार तेली म्हणाले,राज्यात भाजपची सत्ता आहे. तालुकानिर्मितीसाठी सरकार सकारत्मक आहे.त्याशिवाय तालुका,जिल्हा,राज्यात भाजपची सत्ता आहे. त्यामुळे विकास कामासाठी मोठा निधी आणणे शक्य आहे.उमदी ग्रामपंचायतीवर सत्ता असणे गरजेचे आहे.आमच्या पँनेलचे थेट संरपच पदासह सर्व सदस्यांना बहुमतांनी विजयी करावे.

उमदी येथील प्रचार सभेत बोलताना अॅड.चन्नाप्पा होर्तीकर बाजूस भाजप नेते संजयकुमार तेली व मान्यवर

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here