माडग्याळ | जत पुर्व भागातील व्यवसायिक,उद्योजकांची दत्त पतसंस्था अर्थवाहिनी बनेलं विक्रमसिंह सांवत :पतसंस्थेच्या माडग्याळ शाखेचे उद्घाटन

0
13

माडग्याळ, वार्ताहर: दत्त पतसंस्थेच्या माध्यमातून जत पुर्व भागातील बेरोजगार तरूण,व्यवसायिकांना अर्थपुरवठा करून सक्षम करण्यासाठी प्रयत्न करू,या भागातील व्यवसायिक,उद्योजकांची दत्त पतसंस्था अर्थवाहिनी बनेलं असे प्रतिपादन कॉग्रेस नेते तथा जिल्हा बँक संचालक विक्रमसिंह सांवत यांनी केले.

डफळापूर येथील श्री. दत्त पतसंस्थेच्या माडग्याळ शाखेच्या उद्घाटन प्रंसगी ते बोलत होते.यावेळी जत तालुकाध्यक्ष आप्पाराय बिराजदार, उपाध्यक्ष कुंडलिक दुधाळ,माज़ी सभापती बाबासाहेब कोडग, संतोष पाटील अभिजीत चव्हाण, संचालक विठ्ठल निकम,पं.स.सदस्य दिग्विजय चव्हाण,सदाशिव माळी,धर्यशीलराव पतसंस्थेचे चेरअमन धनंजय श्रीसागर,दत्तचे संस्थापक,चेअरमन बाबासाहेब माळी सरपंच आपु जत्ती,उपसरपंच अबांण्णा माळी,सिध्दिविनायक पतसंस्थेचे चेअरमन अजित भोसले,भारत गायकवाड,प्रवीण पथरुट,मकबूल नदाफ आदी मान्यवर उपस्थित होते.

सांवत पुढे म्हटले, जत पुर्व भागातील व्यापार,व्यवसाय नसल्याने,तसेच त्यांना अपेक्षित आर्थिक पाठबंळ मिळत नाही.जत पश्चिम भागातील बेरोजगार तरूण, व्यवसायिक,छोटे उद्योजकांना अर्थपुरवठा या संस्थेच्या माध्यमातून मिळणार आहे. त्याशिवाय पिग्मी एंजन्ट,अन्य कर्मचारी म्हणून तरुणांच्या हाताला काम मिळणार आहे.जत पश्चिम भागात या संस्थेच्या माध्यमातून अनेक बेरोजगार उद्योगाला लागले आहेत.या परिसरातही येत्या दोन वर्षात तसेच चित्र दिसेल.असे शेवटी सांवत म्हणाले.

चेअरमन बाबासाहेब माळी म्हणाले,आम्हच्या संस्थच्या माध्यमातून गेली सोळा वर्षे स्वच्छ, पारदर्शी कारभार करत आहोत.गरजूनां अल्प कागदपत्रे, बचत ठेवीवर कर्जपुरवठा येथून सुरू होईल.त्याशिवाय ठेवीवर आकर्षक व्याजदरही आम्ही संस्थेच्या माध्यमातून देणार आहोत.संस्थेच्या माध्यमातून स्वंयपुर्ण युवक घडविणे असा आमचा संकल्प आहे.

ग्रामपंचायत लगत संस्थेचे कार्यालय सुरू झाले आहे. उमदी, कोतेबोंबलाद,संख,तिंकोडी, बोर्गी, बालगाव,सनमडी, येळवी,वळसंग, दरीबडची, सोरडी,गुड्डापूर, अंकलगी,जाड्डरबोबलाद, सोन्याळ, मुंचडी पर्यत या शाखेतून कामकाज चालणार आहे.

माडग्याळ : श्री. दत्त पतसंस्थेच्या माडग्याळ शाखेच्या उद्घाटन करताना कॉग्रेस नेते विक्रमसिंह सांवत,चेअरमन बाबासाहेब माळी, आप्पु जत्ती, अभिजित चव्हाण, आप्पाराया बिराजदार, दिग्विजय चव्हाण

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here