जत,प्रतिनिधी: जत शहरातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये नर्सचे काम करणाऱ्या तरूणीवर लग्नाचे आमिष दाखवून वारंवार बलात्कार केल्याची फिर्याद जत पोलिसात दाखल झाली आहे. त्यावरून राजू सिध्दा माळी रा.रामपूर,जत यांच्याविरोधात गुन्हा नोंद झाला आहे.
पिडीत तरूणी जत शहरातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये नोकरी करत होती. तेथेच राजू माळी हाही नोकरी करतो.त्यातून दोघाची ओंळख झाली. सन 2011 ते सन 2013 या कालावधीत राजू यांने लग्नाचे आमिष दाखवून त्याच्या घरी व हॉस्पिटलमधील रुममध्ये वारवांर बलात्कार केला असे पिडित मुलीने फिर्यादीत म्हटले आहे. माळी याच्याविरोधात जत पोलिसात तक्रार दाखल आहे. अधिक तपास पिएसआय डोंगरे करत आहेत.
जत,प्रतिनिधी: शहरातील निगडीरोड नजिक दुचाकी लावून शौच्छास गेलेल्या एकाची दुचाकी पळवून नेहत असताना एकाला रंगेहाथ पकडून पोलिसाच्या ताब्यात दिले.योगेश तुकाराम बुरटे,रा-उमराणी रोड जत असे संशियत आरोपीचे नाव आहे.
याबाबतचा गुन्हा जत पोलिसात दाखल झाला आहे.
अधिक माहिती अशी, शहरातील पत्रकार नगर येथे राहणाऱ्या मनोज नारायण कांबळे हे निगडीरोड नजिक दुचाकी लावून शौच्छास गेले होते.दरम्यान रस्त्यावर लावलेल्या दुचाकीची योगेश बुरटे हा वायर सोडवून गाडी पळवून नेहत असताना कांबळे व काही नागरिकांनी त्याला पकडून पोलिसाच्या ताब्यात दिले आहे.
जत,प्रतिनिधी : जत शहरातील मोरे कॉलनी येथील धनंजय नरळे यांच्या घरात फरशी काम करत असताना गंगाराम जँहागीर पासवान (वय-27,रा.हरदी,जि.रुपनदे,नेपा
याबाबतचा गुन्हा जत पोलिसात दाखल झाला आहे.याबाबतची फिर्याद मुकेशचंद रामशरण मोरया वय-26 रा.नखेडा(उत्तरप्रदेश)सध्या मोरे कॉलनी यांनी फिर्याद दिली आहे.
जत,प्रतिनिधी : दरीबडची ता.जत येथील एका 13 वर्षीय मुलाचे अपहरण झाल्याची फिर्याद मुलाच्या वडीलाने जत पोलिसात दिली आहे.प्रदिप बिराप्पा करांडे (वय-13)असे अपहरण झालेल्या मुलाचे नाव आहे.याबाबतचा गुन्हा जत पोलिसात दाखल झाला आहे.अधिक माहिती अशी, दरिबडची गावात राहणाऱ्या बिराप्पा महादेव करांडे यांचा मुलगा प्रदिप यांचे गुरूवारी 17 तारखेला सकाळी 6 वाजनेच्या सुमारास दरीबडची गावातून अज्ञात व्यक्तीने अपहरण करून पळवून नेहल्याची फिर्यादीत म्हटले आहे. जत पोलिस अधिक तपास करत आहेत.



