जत,प्रतिनिधी : डफळापूर येथील श्री.दत्त ग्रा.बिगरशेती सह.पतसंस्थेच्या माडग्याळ येथील तिसऱ्या शाखेचे आज उद्घाटन होत आहे. तालुक्यातील सभासदाच्या विश्वासपात्र ठरलेल्या दत्त पतसंस्थेच्या माध्यमातून सामान्य गरजू व्यापारी,व्यवसायिकांना अर्थपुरवठा करून सक्षम करण्यासाठी या संस्थचे माडग्याळ येथे शाखा सुरू होत आहे. जिल्हा बँक संचालक तथा जि.प.सदस्य विक्रमसिंह सांवत यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली संस्थेचे चेअरमन बाबासाहेब माळी यांनी संस्थेला यशोशिखरावर पोहचविले आहे.
5 जून 2002 ला अगदी अल्प भांडवलात सुरू झालेल्या या संस्थची आजची वार्षिक उलाढाल 95 कोटी 21 लाख रुपये झाली आहे. संस्थेला 2017-18 मध्ये 63 लाख 556 रुपये निव्वळ नफा मिळाला आहे.5157 सभासद असलेल्या संस्थेच्या डफळापूर मुख्य शाखा,कवटेमंहकाळ शाखा,तसेच सलग्न संस्था असलेल्या सिध्दिविनायक पतसंस्था जत या तिन्ही शाखा सतत शंभर टक्के वसुली,नफ्यात सुरू आहेत.संस्थेच्या तिसऱ्या शाखा आजपासून जत पुर्व भागातील व्यापारी,छोटे उद्योजक व सामान्य जनतेसाठी सुरू होत आहे.
सोळा वर्षापुर्वी एका सामान्य युवकांनी संस्था काढण्याचे धाडस केले होते.त्यावेळी अनेक अडचणी,आर्थिक ससेलोट,कोणतीही अनुकूल परिस्थिती नसतानाही निव्वळ संस्थापक चेअरमन बाबासाहेब माळी यांच्या कृतृत्वाने संस्थेला आज हे वैभव प्राप्त झाले आहे. संस्थेच्या सध्या तिन्ही शाखात मिळून 55 बेरोजगार तरूणांच्या हाताला काम मिळाले आहे. त्याचबरोबर हाजारो व्यवसायिक,छोटे उद्योगांना कर्जपुरवठा करून त्यांना उभारी देण्याचे काम संस्थेने केले आहे. गेल्या सोळा वर्षात हाजारो व्यवसायिकांची अर्थवाहिनी म्हणून श्री.दत्त पतसंस्थेला नावलौकिक मिळाला आहे. जेथे बँकाना जमले नाही तेथे दत्त पतसंस्थेने करून दाखविले आहे.डफळापूर, कवटेमंहकाळ, जत परिसरातील अनेक व्यवसायिकांना आधार ठरणारी ही संस्था आज माडग्याळ शाखेच्या माध्यमातून तालुकाभर कार्यक्षेत्र विस्तारत आहे.





