येळवी,वार्ताहर:येळवी(ता.जत)येथील येळवी सर्व सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी महेश मालगत्ते यांची बिनविरोध निवड झाली.दोन वर्षी पूर्वी झालेल्या निवडणूकीत सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती सांगलीचे माजी सभापती प्रकाश जमदाडे व माजी पंचायत समिती सदस्य आर.के.माने यांनी निर्विवाद सत्ता मिळावली होती.निवडी वेळी प्रत्येक वर्षी चेअरमन बदल करण्याचा ठराव झाला होता. त्यानुसार पहिल्यांदा नितिन माने यांची चेअरमन पदी निवड झाली होती,त्या नंतर सुरेश धुळा खिलारे यांना संधी देण्यात आली होती. दुसरे वर्ष पूर्ण होताच सुरेश खिलारे यांनी राजीनामा दिल्यानंतर निवडणुक झाली. अधिकारी तथा सहाय्यक निबंधक ए.एम.यशवंत यांच्या अध्यक्षतेखाली चेअरमन निवड झाली.महेश अशोक मालगत्ते यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक अधिकारी (प्राधिकृत अधिकारी)ए.एम.यशवंत यांनी महेश मालगत्ते यांची चेअरमन म्हणून बिनविरोध निवड झालेचे घोषित केले.यावेळी नुतन चेअरमन मालगत्ते यांचा दर्याप्पा जमदाडे व सचिन माने यांच्या हस्ते सत्कार झाला.यावेळी नूतन चेअरमन महेश मालगत्ते म्हणाले कि,आमचे मार्गदर्शक नेते प्रकाश जमदाडे व आर.के.माने यांनी दाखविलेल्या विश्वासास पात्र राहून सभासदाच्या हिताचा पारदर्शक कारभार करु.यावेळी येळवी सोसायटीच्या संचालिका तथा पंचायत समिती सभापती सौ.मंगल जमदाडे, व्हा.चेअरमन काशिनाथ शिंदे,संचालक नितिन माने,ज्ञानदेव जमदाडे,रामहारी भंडे,माजी चेअरमन सुरेश खिलारे,महादेव जाधव,अभय जमदाडे,रावसाहेब जाधव सचिव.श्री कांबळे यांच्यासह सभासद उपस्थित होते.