जत | जलयुक्त शिवार अभियानातून आतापर्यंत 11 हजार गावे दुष्काळमुक्त ;- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस |

0
8

यावर्षी 6 हजार गावे दुष्काळमुक्त करण्याचा निर्धार

जलसंधारणातून दुष्काळमुक्तीसाठी कटिबध्द – मुख्यमंत्री

सांगली  : महाराष्टाला दुष्काळमुक्त करण्याच्या निर्धाराने सुरू केलेल्या जलयुक्त शिवार अभियानातून आतापर्यंत  राज्यातील 11 हजार  गावे दुष्काळमुक्त झाली आहेत. यावर्षी 6 हजार गावे दुष्काळमुक्त करण्याचा निर्धार व्यक्त केलातसेच जलसंधारणातून दुष्काळमुक्तीसाठी शासन कटिबध्द असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

जत तालुक्यातील आवंढी येथील भटकीमळा डोंगरपरीसरात पाणी फौंडेशन आणि लोकसहभागातून करण्यात येत असलेल्या जलसंधारण कामांची पाहणी करून त्यांनी श्रमदान केले. त्यावेळी ते बोलत होते. त्यांच्यासमवेत आमदार विलासराव जगतापआमदार सुरेश खाडेजिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुखमाजी आमदार पृथ्वीराज देशमुखविभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकरकोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटीलप्रभारी जिल्हाधिकारी अण्णासाहेब चव्हाण,जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊतजिल्हा पोलीस अधीक्षक सुहेल शर्मापाणी फौंडेशनचे डॉ. अविनाश पोळभारतीय जैन संघटनेचे  प्रमुख शांतीलाल मुथा आदि मान्यवर उपस्थित होते.

राज्याचा 50 टक्के भाग दुष्काळाने होरपळत होताया दुष्काळग्रस्त भागाला जलयुक्त शिवारच्या माध्यमातून दुष्काळमुक्त करण्यासाठी मोठ्या धरणांच्या बरोबरीने जलसंधारणाच्या प्रणालीव्दारे ही गावे दुष्काळमुक्त करण्यास शासनाने प्राधान्य दिले असल्याचे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेजलयुक्त शिवार अभियानात लोकसहभाग वाढविल्याने लोकांना ही कामे आपली वाटू लागली  आहेत. त्यामुळे गावागावात जलसाठे निर्माण होवू लागले.  राजकारण,  गट-तट बाजूला सारुन लोकं पाण्यासाठी एकत्र येऊ लागली आहेत. गावात पडणाऱ्या पावसाचा थेंब न थेंब गावाच्या मालकीचा आहेही मानसिकता गावकऱ्यांमध्ये निर्माण झाली असून जलसंधारणाच्या कामात निसर्गाला समजावून घेवून गावकऱ्यांनी काम केल्याने दुष्काळमुक्तीचा मार्ग सुकर झाला आहे.

पाणी फौंडेशनने दुष्काळमुक्तीसाठी हाती घेतलेल्या कामाचे कौतुक करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेपाणी फौंडेशनने जलसंधारणाचे वैज्ञानिक दृष्टिकोनातून मॉडेल तयार करून या कामात गावागावांचा सहभाग घेतला. त्यामुळे अनेक गावात जलसंधारणाची क्रांतीकारी लोकचळवळ उभी राहिली आहे. आज गावाचा धर्मजातपार्टी,गट या सर्वांचे ध्येय केवळ पाणी झाले आहे. सर्वजण एकदिलानेएकजुटीने पाण्यासाठीच काम करीत आहेतही सर्वार्थाने महाराष्ट्राच्या दृष्टीने अभिमानाची बाब असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

 सारे आवंढी गाव जलसंधारणाच्या कामासाठी मैदानात उरतले असून दुष्काळ पराजीत होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. गेल्या 50 वर्षात होऊ न शकलेले काम केवळ एका वर्षात आवंढीकरांनी केले आहे. पाण्याचे शास्त्र समजून घेवून निसर्गाच्या वाटा शोधून जलसंधारणाचे काम केलेहे राज्याला दिशादर्शक आहेअसा गौरवही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला. आवंढीच्या गावकऱ्यांकडून केलेले जलसंधारणाचे काम लाख मोलाचे असून गेल्या 45 दिवसापासून अथक मेहनत करणाऱ्या गावकऱ्यांसमवेत काही वेळ श्रमदान करता आले याचे समाधानही त्यांनी व्यक्त केले.

पाणी आहे तिथे जीवन आहे. पाणी आहे तिथे समृध्दी आहे. अशी पाणीदार समृध्दी गावकऱ्यांच्या ताकदीतून निर्माण करूयाअसे आवाहन करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेपाणी फौंडेशनबरोबरच जैन संघटनेने जलसंधारणाच्या कामासाठी केलेले सहकार्य कौतुकाचे आहे. पाणी फौंडेशनने आयोजित केलेल्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेसाठी सहभाग घेतलेल्या गावांना विशेषत: आवंढी गावकऱ्यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या. आवंढी येथील जलयुक्त शिवारच्या कामाच्या अनुषंगाने डिझेल संदर्भातील प्रश्न निश्चितपणे दूर करू. जलसंधारणाचे काम करणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहूअशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली. आवंढीकरांची एकजूट दुष्काळमुक्तीसाठी उपयुक्त असून राज्याच्या इतर गावांना  ती प्रेरणादायी असल्याचा गौरवही त्यांनी यावेळी केला.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गावकऱ्यांसमवेत जलंधारणाच्या कामामध्ये श्रमदान केले. त्यामुळे काम करणाऱ्या गावकऱ्यांमध्ये उत्साहाचेआनंदाचे वातावरण निर्माण झाले. त्यांनी यावेळी गावकऱ्यांशी संवाद साधला व पाणी फौंडेशनच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या जलसंधारण कामांची माहिती घेतली.

सरपंच अण्णासाहेब कोडग यांनी मान्यवरांचे स्वागत केले व भटकीमळा परीसरात सुरू असलेल्या जलसंधारण कामांची माहिती दिली. ते म्हणालेआवंढी गावात आज भटकीमळा येथे 40 हेक्टर क्षेत्रावर जलसंधारणाचे काम सुरू असून, त्यामध्ये कंपार्टमेंट बंडींगसीसीटीडिप सीसीटीमातीनाला बांधदगडी बांध अशी जलसंधारणाच्या माथा ते पायथा जलसंधारण प्रणाली राबविल्याची माहिती दिली.

समारंभास माजी महापौर सुरेश पाटीलनीता केळकरजैन संघटनेचे जिल्हा प्रमुख राजगोंडा पाटीलपाणी फौंडेशनचे जिल्ह्याचे प्रमुख सत्यवान देशमुखजतचे उपविभागीय अधिकारी तुषार ठोंबरेपाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता एच. व्ही. गुणालेतहसिलदार अभिजीत पाटीलउपसरपंच  प्रदिप कोडग यांच्यासह आवंढी पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

००००

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here