येळवी | शेतकऱ्यांकडून दुध दरवाढीसाठी निषेध |

0
2

येळवी,वार्ताहर:येळवी (ता.जत)मध्ये दुध दर वाढीसाठी दुध रस्त्यावर ओतून निषेध केला. शासनाने गाईच्या दुधाला प्रति लिटर 30 रूपये दर द्यावा या मागणीसाठी दुध उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलन केले. शासनाच्या विरोधात संताप व्यक्त केला. दुधाला दरवाढ न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.यावेळी जत-मंगळवेडा रस्त्यावर दुध ओतून निर्षेध करण्यात आला. यावेळी दुध उत्पादक शेतकरी लिंबाजी सोलनकर, राजु कदम,  संतोष स्वामी, नवनाथ पवार,  विजय माने, आण्णासो पाटिल, विजय रुपनर, दादासो जाधव, गणेश येवले, तात्यासो कोळी, सागर सुतार, आकाश शिंदे, संजय खुळपे, रणजीत जमदाडे, आण्णासो सुतार आदी शेतकरी उपस्थित होते.

येळवी(ता.जत) येथे शेतकऱ्यांकडून दुध दरवाढीचा दुध ओतून निषेध करण्यात आला.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here