जत,प्रतिनिधी: येथील सिध्दार्थ पॉलिटेक्निकच्या वतीने बेरोजगार विद्यार्थ्यासाठी नोकरी मेळावा बुधवार ता.11एप्रिलला आयोजित करण्यात आला होता. त्यात पुणे येथील दुत ट्रान्समशिन चाकण यांच्या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थीचीं लेखी परीक्षा घेतली.लेखी परीक्षा पास झालेल्या विद्यार्थ्यांच्या मुलाखती दि. 7 मेला घेण्यात आली. त्यामध्ये 53
विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना एक लाख 60 हजार प्रती वर्ष पगार,एक वेळ जेवण आणि प्रवास फ्री असे पगाराचे स्वरूप आहे. दुष्काळ भागातून विद्यार्थी घडत आहेत आणि ते घडविण्याचे काम सिध्दार्थ पॉलिटेक्निक करत आहे,हेच आपले ध्येय आहे असे मत चेअरमन डॉ कैलास सनमडीकर यांनी केले. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचें विविध स्तरांतून कौतुक होत आहे.
मेळाव्याचे नियोजन महाविद्यालयाचे प्राचार्य दशरथ वाघमारे यांनी केले.





