जत | उधार दारू पिण्यासाठी दिली नाही,म्हणून काठीने व दगडाने मारहाण | www.sankettimes.com

0
2

जत,प्रतिनिधी: तालुक्यातील बाज येथे उधार दारू पिण्यासाठी दिली नाही,म्हणून देवराम सोमाण्णा सरगर (वय-26 रा. बाज) यांच्या डोक्यावर काठीने व दगडाने मारहाण करून त्यांना गंभीर जखमी केल्याच्या आरोपावरून पिंटू नामदेव बंडगर,नामदेव आप्पासाहेब बंडगर,अंकुश धोंडीराम घोदे (सर्व रा. बाज) यांच्या विरोधात देवराम सरगर यानी जत पोलिसात सोमवारी फिर्याद दाखल केली आहे.ही घटना रविवारी सायंकाळी सात वाजण्याच्या दरम्यान बाज गावातील भरमाचा कट्टा येथे घडली आहे. याप्रकरणी अद्याप कोणासही अटक करण्यात आली नाही.

जत,प्रतिनिधी: तालुक्यातील सिंदूर येथे आमच्या जागेत लावलेले किराणा मालाचे दुकान बाजूला काढ म्हंटल्याच्या कारणावरून प्रशांत आप्पासाहेब मगदूम याने सिध्दाप्पा हुचाप्पा मगदूम( वय-47, रा.सिंदूर) यांच्या डोक्यावर दगडाने मारून त्यांना गंभीर जखमी केल्याच्या आरोपावरून प्रशांत याच्या विरोधात सिध्दाप्पा याने सोमवार फिर्याद दाखल केली आहे.ही घटना रविवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान सिंदूर गावात घडली आहे. याप्रकरणी अद्याप कोणासह अटक करण्यात आली नाही.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here