जत,प्रतिनिधी: संत निरंकारी मंडळ रजि. दिल्ली शाखा जतच्या वतीने सत्संग भवन खैराव(ता.जत) येथे सामुदायिक विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.या विवाह सोहळ्यासाठी पाच जोडप्याचा विवाह प.आ.सुभेदारजी जाधव प्रचारक मुंबई प्रमुख उपस्थितीत होते. यावेळी राजेंद्र क्षिरसागर आणि संगीत ग्रुप सांगली यांनी निरंकारी पध्दतीने लावा(मंगल अष्टिका) चे गायन करुन मंगल अक्षदा टाकण्यात आल्या.निरंकारी मंडळ नेहमीच समाजोपयोगी स्वच्छता अभियान,वृक्ष लागवड, आरोग्य शिबीर यासारखे उपक्रम राबवत असते .यावर्षी जत येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करुन त्यात 123 जणाचे रक्तदान संकलित करण्यात आले.सामुदायिक विवाह सोहळा ग्रामीण भागात प्रथमच आयोजित असल्याने उत्सकुता निर्माण झाली होती.या विवाह सोहळ्यातून मानव जातीला प्रेरक असा संदेश दिला गेला.विशेष म्हणजे विवाह झालेली जोडपी हे विविध जाती धर्माचे होते.निरंकारी मंडळ हे मानवता ही एकच मानवाची जात व धर्म आहे या शिकवणी द्वारे संपूर्ण समाज एकत्रित आणण्याचे कार्य करीत आहे मानव सेवा हीच ईश्वर सेवा या उदात्त भावनेने हे मंडळ संपुर्ण विश्वामध्ये विश्वबंधुत्व निर्माण करण्याचे महान कार्य करीत आहे .या विवाह सोहळ्याचे कौतुक संपुर्ण गावातील ग्रामस्थांनी केले. या सामूहिक विवाह सोहळा करिता संत निरंकारी मंडळाचे सांगली विभागप्रमूख जालिंदर जाधव ,राजेंद्र क्षिरसागर जत शाखेचे जोतिबा गोरे ,संभाजी साळे ,आबासो काटे कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली चे माजी सभापती प्रकाश जमदाडे,पंचायत समिती जतच्या सभापती सौ. मंगलताई जमदाडे,खैरावचे संरपंच राजाराम घूटूकडे यांच्यासह खैराव ,टोणेवाडी ,येळवी,हंगिरंगे व जत तालुक्यातील निरंकारी भक्तगण व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थितीत होते .
संत निरंकारी मंडळाच्या वतीने सामुदायिक विवाह सोहळ्यात पाच वधू-वरांचे विवाह संपन्न झाले.





