जत | जत-उमराणी रोडवर अवजड वाहनाने धडक दिल्याने एकाचा मुत्यू | www.sankettimes.com

0
2

जत,प्रतिनिधी: जत-उमराणी रोड वर पोतदार मळ्याजवळ अॅटोरिक्षाला अवजड वाहनाने धडक दिल्याने एकाचा मुत्यू झाला. घटना शुक्रवारी रात्री साडेसातच्या सुमारास घडली.पिंकू अनिल चव्हाण (वय-23,रा.उमराणी तांडा,जत) असे मयताचे नाव आहे.

अधिक माहिती अशी,पिंकू चव्हाण आपल्या कुंटुबियासह मेढींगिरी येथील मरगूबाई(लक्ष्मी)देवीची यात्रा करून जतला येत असताना समोरून येणाऱ्या एका पिवळ्या अवजड वाहनाने धडक दिली. त्यात पिंकू जागीच ठार झाला तर अॅटोमधील बाकीचे किरकोळ जखमी झाले आहेत.

याप्रकरणी मल्लाप्पा गोपाळ काळे, रा.एसएस कॉलनी, रिमांड होम विजापूर यांनी जत पोलिसात फिर्याद दिली आहे. तसा गुन्हा जत पोलिसात दाखल झाला आहे. दरम्यान पोलिसांनी वाहन ताब्यात घेतल्याचे कळतयं.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here