शेगाव | शेतकऱ्यांचे उपोषण लेखी आश्वासनानंतर मागे | www.sankettimes.com

0
1

जत,प्रतिनिधी: शेगाव(ता.जत)येथील साठवण तलाव क्रमांक दोन मध्ये म्हैसाळ योजनेचे  पाणी सोडण्यासाठी लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यानी जत तहसिल कार्यालयासमोर शुक्रवार दि.4 पासून सुरू असलेले आमरण उपोषण अखेर जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांने लेखी आश्वासन दिल्याने शनिवारी मागे घेण्यात आले.शेगाव येथील साठवण तलाव क्रं.2 मधील लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी पाणीपट्टी भरूनही पाणी सोडले नव्हते.त्यामुळे शेतकऱ्यांनी अंदोलनांचा

पवित्रा घेत जत तहसिल कार्यालया समोर शुक्रवार पासून उपोषण सुरू केले होते.शुक्रवारी सांयकाळी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना 100 क्युसेस पाणी सोडण्याची तयारी दर्शवली होती.मात्र त्यागतीने तलावात अपेक्षित पाणी येणार नसल्याने 200 क्युसेस सोडावे तरचं उपोषण मागे घेऊ असा पवित्रा उपोषण कर्त्या शेतकऱ्यांनी घेतला होता.शनिवारी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुन्हा शेतकऱ्यांशी चर्चा केली व वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशावरून 160 क्युसेस गतीने पाणी सोडण्याचे मान्य करत लेखी पत्र दिले. त्यामुळे अखेर उपोषण मागे घेण्यात आले. दत्ता निकम, शहाजी गायकवाड, शहाजी बोराडे, माणिक बोराडे, राम नाईक,ज्ञानदेव निकम, शामराव शिंदें, उमेश गायकवाड, अशोक गायकवाड, निवृत्ती बोराडे, पप्पु निकम, विजय माने, अशोक गायकवाड, सोपान निकम ,आदी शेतकरी उपोषणास बसले होते.अॅड.प्रभाकर जाधव यांनी मध्यस्थी केली.दरम्यान शनिवारी उपोषण कर्त्या शेतकऱ्यांनी तहसिलदार अभिजित पाटील, म्हैसाळ योजनेचे उपविभागीय अधिकारी एस.जे.शिंदे यांनी लेखी आश्वासन देऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली.मुख्य कँनॉल पासून पुर्ण क्षमतेनी तलावात पाणी सोडण्यात येईल,त्यासाठी कुठे कँनॉल फोडाफोडीचा प्रकार झाल्यास पोलिसांची मदत घेण्यात येईल असे आश्वासन उपस्थित अधिकाऱ्यांनी दिले.अॅड.प्रभाकर जाधव, व उपस्थित अधिकाऱ्याच्या हस्ते सरबत पिऊन उपोषण मागे घेण्यात आले.

शेगाव ता.जत येथील तलावात पाणी सोडण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे उपोषण अखेर मागे घेण्यात आले.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here