संख,वार्ताहर :केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत यशस्वी गणेश टेंगले सारखे तरूण जतचा इतिहास बदलतील.जतची माती सर्वगुणसंपन्न आहे.त्यातून अनेक हिरे चमकले आहेत.गणेश त्यापैंकी एक आहे,असे प्रतिपादन आ. विलासराव जगताप यांनी केले.युपीएस पिरिक्षेतील यशवंत गणेश टेंगले यांचा व त्याचे आई-वडीलांचा सत्कार ‘आमदार विलासराव जगताप यांच्या हस्ते यांच्या शनिवारी खंडनाळ येथे’करण्यात आला.यावेळी डिवायएसपी नागनाथ वाकुर्डे, तहसिलदार नागेश गायकवाड, जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील,भाजप नेते गोपिचंद पडळकर,माजी सभापती आर.के.पाटील, अॅड.प्रभाकर जाधव, चिमण डांगे,विष्णू माने,पोलिस निरिक्षक भगवान सांळुखे आदी मान्यवर उपस्थित होते.
आ.जगताप पुढे म्हणाले,सर्वसाधारण कौटुंबिक परिस्थिती, जिल्हा परिषदेसह सर्वसामान्य मराठी माध्यमांच्या शाळेतून शिक्षण घेतलेल्या जत तालुक्यातील तरुण गणेश टेंगलेचे केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या भारतीय प्रशासकीय सेवा परीक्षेतील यश येत्या पिठीला प्रेरणा देणार आहे.जत सारख्या दुष्काळी भागात कोणतीही अनुकूल परिस्थिती नसताना जिद्द,प्रंचड महत्वकांक्षा,मेहनत गणेशला यश मिळवून दिली आहे. खंडनाळ-कुलाळवाडी सारख्या छोट्या वाडीतील मराठी शाळेतून गणेशची सुरूवात भविष्यात मराठी शाळेतील विद्यार्थ्याना आदर्श ठरतील. गणेश सारखे यश मिळविण़्यासाठी तालुक्यातील तरूणांनी प्रयत्न करावेत. असे शेवटी आ.विलासराव जगताप म्हणाले,यावेळी गणेश टेंगले व वडील महादेव व आईचाही भव्य सत्कार करण्यात आला.सत्काराचे नियोजन खंडनाळ ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले.
संख :केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या यशस्वी गणेश टेंगले यांचा सत्कार करताना आ.विलासराव जगताप,डिवायएसपी नागनाथ वाकुर्डे, प्रभाकर जाधव,चिमण डांगे आदी मान्यवर